Radhe Shyam OTT : प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, राधेश्याम ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

Radhe Shyam OTT : प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, राधेश्याम 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार
राधे श्याम

आता ‘राधे श्याम’ हा सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होतोय. त्यामुळे प्रभासच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

आयेशा सय्यद

|

Mar 28, 2022 | 6:50 PM

मुंबई : ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासच्या (Prabhas) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) या चित्रपटाबाबत असंच काहीसं झालंय. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. तब्बल 350 कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. मात्र आता हा सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होतोय. त्यामुळे प्रभासच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. राधे श्याम हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होतोय. येत्या एक एप्रिलपासून हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर पाहता येईल.

कधी आणि कुठे प्रदर्शित होणार?

राधे श्याम हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होतोय. येत्या एक एप्रिलपासून हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर पाहता येईल.

सिनेमाची गोष्ट

राधे श्याम ही अशा दोघांची प्रेमकहाणी आहे, ज्यांना त्यांच्या हातावरील रेषा कधीच एकमेकांना भेटू देऊ शकत नाहीत. ज्यांचं नशीब नेहमीच एकमेकांपासून वेगळं करण्याचा कट रचतो. विक्रम आदित्य (प्रभास) आणि प्रेरणा (पूजा हेगडे) यांची ही प्रेमकहाणी आहे. विक्रम हा हाताच्या रेषा पाहून भविष्य सांगतो. त्याने सांगितलेलं भविष्य कधीच चुकत नाही, असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. पुढे काय होणार हे त्याला आधीच माहीत असतं. याच शक्तीमुळे विक्रमला समजतं, की त्याच्या आयुष्यात प्रेम कधीच येऊ शकत नाही. दुसरीकडे, प्रेरणा ही व्यवसायाने डॉक्टर आहे आणि तिचा या भविष्यवाणीवर विश्वास नाही. हे संपूर्ण चित्रपटाचं कथानक आहे. एक हाताच्या रेषांनाच जीवनाचं सत्य मानतो तर दुसरी फक्त तिच्या कर्मावर विश्वास ठेवते. चित्रपटात मधेच इतरही अनेक घटना आहेत. दोघंही प्रेमात पडतात, पण एकाला ते प्रेम कळत नाही, तर दुसरा ते प्रेम मिळवण्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडायला तयार होतो. आता हातावरच्या रेषांनी सांगितलेलं भविष्य खरं ठरतं, की प्रेरणाच्या विचारांचा विजय होतो, हे दोघं एकत्र येऊ शकतात की नाही, विक्रमचा अंदाज खरा ठरेल की खोटा, हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.

संबंधित बातम्या

Video : Urfi Javed फॅन्सी ड्रेस घालून आली, पण फोटो काढायला जागाच सापडेना… थेट वॉचमनशी भिडली

KGF Chapter 2 Trailer : आला रे आला ‘केजीएफ-2’ आला… नुसता ॲक्शनचा धमाका, ‘या’ तारखेला सिनेमा प्रदर्शित होणार

शून्यातून यूट्यूब सेलिब्रिटी होण्यापर्यंतचा प्रवास… Ganesh Shinde आणि Yogita Shinde यांनी उलगडला, सहज- साधा पण प्रेरणादायक…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें