AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bob Biswas Trailer : अभिषेक बच्चनच्या अभिनयाची जादू, ‘बॉब बिस्वास’ करणार प्रेक्षकांचं फुल टू मनोरंजन!

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंह यांच्या 'बॉब बिस्वास' या नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या आला आहे. ट्रेलरमध्ये ‘बॉब बिस्वास’ या मध्यमवयीन हिटमॅनच्या प्रवासाचा मागोवा घेण्यात आला आहे,  जो बराच काळानंतर कोमातून बाहेर पडतो आणि नंतर त्याला त्याच्या आयुष्यातील घटना, त्याचे कुटुंब आणि त्याच्या भूतकाळाबद्दल कोणतीही गोष्ट आठवत नाही.

Bob Biswas Trailer : अभिषेक बच्चनच्या अभिनयाची जादू, ‘बॉब बिस्वास’ करणार प्रेक्षकांचं फुल टू मनोरंजन!
Abhishek Bachchan
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 2:16 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंह यांच्या ‘बॉब बिस्वास’ या नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या आला आहे. ट्रेलरमध्ये ‘बॉब बिस्वास’ या मध्यमवयीन हिटमॅनच्या प्रवासाचा मागोवा घेण्यात आला आहे,  जो बराच काळानंतर कोमातून बाहेर पडतो आणि नंतर त्याला त्याच्या आयुष्यातील घटना, त्याचे कुटुंब आणि त्याच्या भूतकाळाबद्दल कोणतीही गोष्ट आठवत नाही.

अभिषेक बच्चन एकामागून एक असेच जबरदस्त चित्रपट निवडत असून, त्याच्या अभिनयाची खोली आता लोकांना कळू लागली आहे. त्याच्या भूमिकांबाबत तो ज्या प्रकारचे प्रयोग करत आहे, ते पाहता तो लवकरच मनोरंजन विश्वात नंबर वन स्टार होऊ शकतो, असे म्हणता येईल.

काय आहे कथा?

‘बॉब बिस्वास’च्या भूमिकेत अभिषेक बच्चन आपली खरी ओळख आठवण्याचा प्रयत्न करत असताना, त्याच्या भूतकाळातील घटना जिवंत होतात. या प्रवासात तो स्वत:च्या कृतींचा इतिहास विरुद्ध नव्याने समोर आलेल्या गोष्टी, या दुविधेत तो सापडतो.

पाहा ट्रेलर :

माझ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक!

ट्रेलरबद्दल बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला की, ‘बॉब बिस्वास यांच्यावर काम करण्यासाठी आमच्याकडे एक अप्रतिम टीम होती. मला खोलवर जाण्यात आणि बॉबच्या विस्मृतीत गेलेल्या जगाची निर्मिती करण्यात खूप आनंद झाला. मी काम केलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी हा एक आहे आणि मला आशा आहे की, लोकांना ट्रेलर आणि चित्रपटाचा खरोखरच आनंद मिळेल.’

ट्रेलर लाँचवर प्रतिक्रिया देताना चित्रांगदा सिंह म्हणाली, ‘बॉब बिस्वास’ हा एक अनोखा चित्रपट आहे आणि मला त्याचा एक भाग असल्याचा आणि तो बनवणाऱ्या अप्रतिम टीमसोबत काम केल्याचा मला अभिमान आहे. ही एक मनोरंजक व्यक्तिरेखा आणि त्याच्या सभोवतालच्या लोकांची आकर्षक कथा आहे. चित्रपटात रहस्य, धमाल आणि गोंधळाची योग्य मात्रा आहे, जी प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल.

दिया अन्नपूर्णा घोष दिग्दर्शित आणि सुजॉय घोष लिखित ‘बॉब बिस्वास’ची निर्मिती गौरी खान, सुजॉय घोष आणि गौरव वर्मा यांनी केली आहे. हा चित्रपट रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रस्तुत निर्मिती आहे. हा क्राईम-ड्रामा एका प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे, ज्यात कॉन्ट्रॅक्ट किलर बॉब बिस्वासच्या दुहेरी आयुष्याचे चित्रण आहे.

हेही वाचा :

Farm Laws | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा, प्रतिक्रिया देताना तापसी पन्नू म्हणते…

Hina Khan | हिना खानने बाथटबमध्ये केलं फोटोशूट, बोल्ड फोटोंनी घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ!

Happy Birthday Sushmita Sen | ‘मिस इंडिया’च्या स्पर्धेत ऐश्वर्या रायला दिली तगडी टक्कर, एका प्रश्नाचं उत्तर देत सुष्मिताने जिंकली मने!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.