AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahrukh Khan: शाहरुख खानला सतावतेय फॅन्स दुरावण्याची भीती, कारण काय?

व्हिडीओमध्ये, शाहरुख खान अभिनेता राजेशशी बोलताना म्हणतो की इतके चाहते कोणाच्या घराबाहेर आलेले पाहिले आहेत? राजेश त्यांना उत्तर देतो, नाही सर, अजून पाहिले नाही. पण पुढे काही सांगू शकत नाही. (Fear of losing fans to Shah Rukh Khan)

Shahrukh Khan: शाहरुख खानला सतावतेय फॅन्स दुरावण्याची भीती, कारण काय?
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 7:20 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) किंग खान शाहरुख खानला (Shahrukh Khan) मोठ्या पडद्यावर प्रत्येकजण मिस करत आहे. तो स्वतः सध्या FOMO शी लढत आहे. फोमो म्हणजे हरण्याची भीती (काहीतरी गमवण्याची भीती). अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकलं आहे. मात्र शाहरुखनं अजून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश केलेला नाही. अशा परिस्थितीत शाहरुखला त्याचे चाहते त्याची साथ सोडतील अशी भीती आहे.

फिल्ममेकर करण जोहरनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शाहरुख त्याच्या बाल्कनीत उभा राहून एका व्यक्तीशी बोलत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो बाल्कनीतून उभा राहून त्याच्या चाहत्यांना हाय हॅलो म्हणताना दिसत आहे.

शाहरुखला वाटतेय प्रचंड भीती

व्हिडीओमध्ये, शाहरुख खान अभिनेता राजेशशी बोलताना म्हणतो की इतके चाहते कोणाच्या घराबाहेर आलेले पाहिले आहेत? राजेश त्यांना उत्तर देतो, नाही सर, अजून पाहिले नाही. पण पुढे काही सांगू शकत नाही.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

चाहत्यांना हाय हल्लो म्हणताना शाहरुख खान म्हणतो म्हणजे, मग राजेश म्हणतो की इतर सर्व स्टार्सचे शो आणि चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर येत आहेत, तुमचे नाहीत. शाहरुख त्याला विचारतो, बरं बाकी सगळे कोण? राजेश नाव घेतो अजय देवगण, अक्षय कुमार, सैफ अली खान आणि संजय दत्त… नंतर शाहरुख म्हणतो की सगळेच आहेत का, त्यावर राजेश म्हणतो की सगळे नाही.  शाहरुख विचारतो कोण नाही तर तो म्हणतो सर, तुम्ही…

शाहरुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश करणार?

व्हिडीओच्या शेवटी, शाहरुख म्हणतो की शाहरुख खान वगळता सर्वात मोठे स्टार्स डिस्ने प्लस हॉटस्टारवर आहेत.  करण जोहरनं ही पोस्ट शेअर करत शाहरुखनं लिहिलं आहे की- हम्म्म पिच्चर अजून बाकी आहे … माझ्या मित्रा.

शाहरुख खानचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चाहत्यांना वाटतंय की SRK OTT प्लॅटफॉर्मवर धमाका करणार आहे. या व्हिडीओसह शाहरुखनं चाहत्यांना एक इशारा दिला आहे.

शाहरुख खान शेवटी झिरो चित्रपटात कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मासोबत दिसला होता. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून शाहरुखनं अभिनय जगापासून अंतर ठेवलं आहे. तो लवकरच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत पठाण चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

Khushi- Navya : नव्या नवेलीची खुशी कपूरसोबत जंगी पार्टी, पाहा खास फोटो

Thalaivii BO Collection Day 1: कंगनाची जादू नाहीच, ‘थलायवी’कडे प्रेक्षकांची पाठ; पहिल्या दिवशी इतकीच कमाई

Kangana Ranaut : जयललिता असत्या तर कंगनाऐवजी ‘या’ अभिनेत्रीला मिळाली असती बायोपिकमध्ये काम करण्याची पहिली संधी

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.