Jamtara 2 Review : जामतारा 2 वेब सीरिज पहिल्या भागापेक्षाही अधिक रंजक, वाचा पुर्ण रिव्यू

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Sep 27, 2022 | 10:05 AM

जामतारा 2 मध्ये दाखवण्यात आले आहे की, जामतारा येथील लोकांनी आता हटके स्टाईलमध्ये सायबर क्राईम करण्यास सुरूवात केलीये.

Jamtara 2 Review : जामतारा 2 वेब सीरिज पहिल्या भागापेक्षाही अधिक रंजक, वाचा पुर्ण रिव्यू

मुंबई : बहुचर्चित जामतारा वेब सीरिजचा दुसरा भागही रंगतदार ठरलाय. Netflix ची लोकप्रिय वेब सीरिज ‘जामतारा सबका नंबर आएगा’ चा सीजन 2 (Jamtara 2) पहिल्या भागापेक्षाही अधिक भारी असल्याचे पुढे येतंय. खरोखरच जामतारा वेब सीरिजच्या (Web series) लेखकाचे काैतुक करावे तेवढे नक्कीच कमी आहे, कारण पहिल्या भागापेक्षाही अधिक दुसऱ्या भागाची मांडणी आणि रंजकता वाढवण्यात आलीये. दुसऱ्या भागातही तुमचे बँक खाते (Bank account) आधार आणि पॅन काॅर्डला लिंक करायचे आहे, मी बँकमधून बोलत आहे, जर तुम्ही हे आजच करून घेतले नाही तर तुम्हाला बँकशी संबंधित कोणतेच व्यवहार करता येणार नाहीत. या लोकांना जो व्यक्ती ओटीपी सांगतो त्याचे खाते रिकामे झालेले असते.

जामतारा ही वेब सीरिज तब्बल दोन वर्षांनी परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. पहिल्या सीजनवर चाहत्यांनी प्रचंड प्रेम केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते Netflix च्या लोकप्रिय वेब सीरिज जामतारा 2 ची आतुरतेने वाट पाहत होते.

अखेर जामताराचा सीजन 2 रिलीज झाले आहे. सीजन 1 प्रमाणेच यावेळीही जामतारा 2 मध्ये सायबर फसवणूक कशाप्रकारे केली जाते, हे सर्व सविस्तरपणे दाखवण्यात आले आहे. यावेळी जामतारा वेब सीरिजमध्ये जबरदस्त अभिनय करत वेब सीरिजला अमित सियाल, स्पर्श श्रीवास्तव, मोनिका पंवार यांनी खास बनवले आहे. जामतारा 2 वेब सीरिजला रेटिंग 3 स्टार मिळाले आहे.

जामतारा 2 मध्ये दाखवण्यात आले आहे की, जामतारा येथील लोकांनी आता हटके स्टाईलमध्ये सायबर क्राईम करण्यास सुरूवात केलीये. जामतारा येथील लोक आता विविध प्रकारे लोकांची ऑनलाईन  पध्दतीने फसवणूक करत आहेत.

विशेष म्हणजे या भागामध्ये हेही दाखवण्यात आले आहे की, ऑनलाईन पध्दतीने घोटाळे करताना जामतारा येथील मुले कशी पकडली गेली आहेत आणि त्यांनी कशाप्रकारे यातून स्वत: ची सुटका करून घेतलीये.

जामतारा 2 वेब सीरिजचे लेखक त्रिशांत श्रीवास्तव आहेत. अंशुमन पुष्कर, अक्षा परदासनी, दिव्येंदू भट्टाचार्य, अमित सियाल, पूजा झा यांनी आपल्या अभिनयाने जामतारा वेब सीरिजला अधिक खास बनवले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI