AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KGF Chapter 2 | संजय दत्तच्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राईज, पाहा KGF 2च्या ‘Adheera’चा खतरनाक लूक!

आज (29 जुलै) बॉलिवूडचा 'संजू बाबा' म्हणजेच अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांनी त्यांना या खास दिवशी गिफ्ट द्यायला हवे, पण इथे अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांनाच खास भेट दिली आहे.

KGF Chapter 2 | संजय दत्तच्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राईज, पाहा KGF 2च्या ‘Adheera’चा खतरनाक लूक!
KGF 2
| Edited By: | Updated on: Jul 29, 2021 | 12:54 PM
Share

मुंबई : आज (29 जुलै) बॉलिवूडचा ‘संजू बाबा’ म्हणजेच अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांनी त्यांना या खास दिवशी गिफ्ट द्यायला हवे, पण इथे अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांनाच खास भेट दिली आहे. संजय दत्तने त्याच्या आगामी ‘केजीएफ: चॅप्टर 2’ (KGF : Chapter 2) या चित्रपटाच्या खतरनाक लूकसह आपले नवीन पोस्टर चाहत्यांसाठी शेअर केले आहे. यात संजय दत्त खूपच जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे.

हातात दुहेरी तलवार असलेल्या नव्या पोस्टरमुळे संजय दत्त चाहत्यांची उत्सुकता वाढवत आहे. पोस्टर शेअर करताना, त्याने त्यांच्या चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि त्यांच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. पोस्टर शेअर करताना संजय दत्तने कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. हे # केजीएफ चॅप्टर 2वर आश्चर्यकारकपणे काम करत आहे. मला माहित आहे की तुम्ही सर्वजण बर्‍याच काळापासून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत होतात आणि मी तुम्हाला खात्री देतो की, ही प्रतीक्षा व्यर्थ ठरणार नाही.”

पाहा पोस्टर :

View this post on Instagram

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

काही मिनिटांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या या पोस्टरवर जवळपास दोन लाख लाईक्स मिळाल्या आहेत. त्याच्या या लूकचे लोक खूप कौतुक करत आहेत. संजय दत्तने सलग तीन वाढदिवशी या चित्रपटाचे तिसरे पोस्टर लाँच केलं आहे. 2019 मध्ये, चाहत्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी त्याने पहिले ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर प्रसिद्ध केले, आणि  असे लिहिले की, “धन्यवाद यश, अधीरा म्हणून  #केजीएफमध्ये सामील झाल्यामुळे खरोखर आनंदी आणि उत्साहित आहे. लवकरच भेटूया राक्षसाला”

दमदार स्टारकास्ट

अभिनेता यश या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे, ज्याने पहिल्या भागातून सर्वांचे मन जिंकले आहे. यश आणि संजय व्यतिरिक्त अभिनेत्री रवीना टंडन हीचीही या चित्रपटात महत्वाची भूमिका आहे. आतापर्यंत सर्व पात्रांचे लूक समोर आले आहेत.

चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान संजय आणि यश त्यांच्यात जबरदस्त बाँडिंग निर्माण झाली आहे. दोघेही बराच वेळ एकत्र घालवायचे. असं म्हटलं जात होतं की, शूटिंग दरम्यान असं वाटत नव्हतं की संजू आणि यश प्रथमच एकत्र काम करत आहेत. शूटिंग जसजशी पुढे सरकत गेली, तसतसे या दोघांचे बॉन्डिंगही एकमेकांशी वाढत गेले. दोघेही एकत्र खूप बोलायचे आणि आतापर्यंतच्या कारकिर्दीचा अनुभव एकमेकांसोबत शेअर करायचे.

संजय दत्तच्या हातात आणखी बरेच प्रोजेक्ट!

याशिवाय संजय आणखी बऱ्याच चित्रपटात दिसणार आहे. तो ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’, ‘शमशेरा’ आणि ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात दिसणार आहे.

(KGF Chapter 2 new poster of Adheera launch on Sanjay dutt’s birthday)

हेही वाचा :

जावेद अख्तर यांची याचिका फेटाळल्यानंतर, आशिष कौलनी कंगना रनौत विरोधात दाखल केली अवमान याचिका!

Death Anniversary | कधी काळी बस कंडक्टर म्हणून काम करायचे जॉनी वॉकर, ‘या’ दिग्दर्शकांनी दिला ब्रेक नि बनले सुपरस्टार!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.