जान्हवी, हा काय गेम आहे तुमचा? तुम्ही सर्वात व्हर्स्ट… रितेश देशमुख यांनी जे सुनावलं तसं कधीच घडलं नव्हतं!

बिग बॉस मराठीच्या घरात शनिवारी चांगलाच क्लास रंगला. अभिनेते रितेश देशमुख यांनी जान्हवी किल्लेकर हिची चांगलीच शाळा घेतली. अभिनेते पॅडी कांबळे यांच्याशी जान्हवी ज्या उद्धटपणे वागली. त्यावरून रितेश यांनी संताप व्यक्त केला. आठवड्याभरातील तिच्या वागण्याचं मोजमापच त्यांनी काढलं.

जान्हवी, हा काय गेम आहे तुमचा? तुम्ही सर्वात व्हर्स्ट... रितेश देशमुख यांनी जे सुनावलं तसं कधीच घडलं नव्हतं!
Janhavi KillekarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 25, 2024 | 10:17 PM

बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये शनिवारी बऱ्याच मोठ्या घडामोडी घडल्या. शनिवारी भाऊच्या धक्क्यावर अभिनेता रितेश देशमुख यांनी जान्हवी किल्लेकर हिच्या बिग बॉसमधील घरात वागण्याचा चांगलाच पंचनामा केला. जान्हवीने अभिनेते पॅडी ऊर्फ पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केला होता. तुम्ही ओव्हर ॲक्टिंग करत आहात, असं म्हणून जान्हवीने पॅडी यांचा पाणऊतारा केला होता. या प्रकरावर रितेश देशमुख चांगलेच संतापले होते. भाऊचा धक्का सुरू होताच रितेश देशमुख यांनी जान्हवी हिला चांगलंच फैलावर घेतलं. जान्हवीच्या वागण्यावर कडक शब्दात ताशेरे ओढतानाच तुम्ही बिग बॉसमधील सर्वात व्हर्स्ट कंटेस्टंट आहात, असं रितेश देशमुख म्हणाले. यावेळी जान्हवीला अश्रू आवरता आले नाहीत.

रितेश देशमुख यांनी जान्हवीला तिच्या वागण्यावरून चांगलंच सुनावलं होतं. एवढेच नव्हे तर तिला आपल्या अभिनयाबद्दल काय वाटतं असं विचारत चिमटेही काढले होते. जान्हवी कशी वाटली माझी ॲक्टिंग? माझ्या ॲक्टिंगबद्दल परफॉर्मन्स बद्दल काय मत आहे? माझी ॲक्टिंग ठिक आहे की ओव्हर आहे? तुम्ही इतर सदस्यांना ॲक्टिंगचं सर्टिफिकेट देत आहात. म्हटलं मीही घ्यावं. तुम्ही ॲक्टिंगचे गुरू आहात. तज्ज्ञ आहात. तुम्हाला ॲक्टिंग कळते. चांगली काय? वाईट काय? ओव्हर काय? अहो, तुम्ही काय सर्टिफिकेट देणार? तुम्हाला ऑडियन्सने एक सर्टिफिकेट दिलं आहे. जान्हवी, तुम्ही बिग बॉस मराठीतील सर्वात व्हर्स्ट कंटेस्टंट आहात. अहो, कंटेस्टंट काय? आता तुम्ही माणूसपण कसे आहात ना यावर लोकांना प्रश्न आहे, अशा शब्दात रितेश देशमुख यांनी जान्हवीला सुनावले.

काय म्हणाला पॅडी भाऊला?

तुम्ही पॅडी भाऊंना काय म्हणाला? आयुष्यभर ओव्हर ॲक्टिंग केली. इथेही ओव्हर ॲक्टिंग करत आहात. तुमची हिंमत कशी झाली पॅडी भाऊंना बोलायची? 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे पॅडी भाऊंचा. नाटकांचे हजारो प्रयोग केले. 25 ते 30 चित्रपट केले. मालिकांचं तर विसरूनच जा तुम्ही. तुम्ही त्यांची ॲक्टिंग काढता? काय तर म्हणे ओव्हर ॲक्टिंग करताय? असा संताप रितेश यांनी व्यक्त केला.

यापूर्वी तुम्ही वर्षाजींची ॲक्टिंग काढत होता. आता पॅडीजींची काढताय. कोणत्या गोष्टीत किती पर्सनल जावं याला काही लिमिट असतं. तुम्ही या घरात सर्व लिमिट क्रॉस करत आहात. डिक्शनरीत हा, ओव्हर हा शब्द असेल तर तो फक्त तुमच्यासाठी. तुमचा उद्धटपणा ओव्हर आहे. ॲटिट्यूड ओव्हर आहे. अग्रेशन ओव्हर आहे. तुमचा अरोग्न्स आहे ना तो ओव्हरच्या ओव्हर आहे. आज या सर्वांचा या भाऊच्या धक्क्यावर मी बंदोबस्त करणार आहे, असंही रितेश यांनी सुनावलं.

तुम्ही करिअर संपवायला आला

हा काय गेम आहे तुमचा? जो दिसेल त्याचा अपमान करत सोडायचं. धक्के मारत जायचं. वाट्टेल ते बोलायचं. हा शो फक्त तीन महिन्यासाठी आहे. तीन महिन्यानंतर बाहेर आयुष्य आहे. विसरला का त्याबद्दल? तुमचं करिअर आहे. लोकं इथे करिअर घडवायला येतात. तुम्ही संपवायला आलात. जान्हवी हा तुमचा जो ओव्हर कॉन्फिडन्स ना तो तुम्हाला प्रचंड नडणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

ते खरं होतं की नाटक होतं?

रितेश देशमुख झापत असताना जान्हवी अश्रू ढाळत होती. जेव्हा रितेश यांनी तुम्ही तुमचं करिअर संपवायला आला आहात असं म्हटलं तेव्हा, तिने सॉरी म्हटलं. त्यावर पुन्हा एकदा रितेश यांनी जान्हवीला फैलावर घेतलं. नाही नाही प्लीज. तुमची सॉरी प्रचंड वेळा ऐकली. यापूर्वीही तुम्ही रडला. नंतर काय झालं? मला संशय आहे. ते खरं होतं की नाटक होतं? जान्हवी सोडून द्या ना? तुम्ही गेल्यावेळी जे केलं ते नाटक होतं. तुम्ही नाटकी आहात, ढोंगी आहात. हे सर्व कॅमेऱ्यात दिसतंय. हे सर्व लोकांना कळतंय, असंही ते म्हणाले.

तुम्ही ड्रामा करतच नाही, तुम्ही तर…

तुम्ही पॅडी भाऊंना बोललात. अख्खा दिवस गेला. दुसऱ्या दिवशी तुम्हाला रिअलाईज झालं आपलं चुकलं. पण हे नाटक होतं. आम्ही बाहेर बसून पाहतोय. आम्हाला दोन कारण दिसतात. शनिवारी भाऊचा धक्का आला तर मी काय बोलणार? असं तुम्हाला वाटलं. आणि दुसरं कारण म्हणजे अरबाज यांनी निक्कीला कॅप्टन बनवून दानशूरपणा दाखवला. अरबाज दानशूर झाले. त्यांनी स्वत:चं बलिदान दिलं. निक्की सेफ, अरबाज हिरो, माझं काय? मी काय करू? असं तुम्हाला वाटलं. मग तुमच्या मनात आली इन सेक्युरिटी. तुम्ही केला ड्रामा. पण तुम्ही ड्रामा करतच नाही. करता ड्रामा? नाही ना? तुम्ही तर मेलो ड्रामा करता, असा टोलाही रितेश यांनी लगावला.

मग तुम्हाला…

तुम्ही सर्व कॅमेरे तुमच्याकडे घेता. तुमच्या ड्राम्यात अडकले धनंजय. ते तुम्हाला पॅडी भाऊकडे घेऊन गेले. मग तो माफीनामा… ते खरंच होतं का? आम्हाला तर तसं वाटलं नाही? हा पॅटर्न झाला. वाटेल ते बोलायचं, मग रडायचं. दुर्देवाने तुम्हाला चक्कर येते. दोन दिवसानंतर परत तेच करायचं. एवढं असूनही पॅडी भाऊंनी तुम्हाला माफ केलं, असंही त्यांनी सांगितलं.

तुम्ही वयही विसरलात…

पॅडी भाऊ मानलं तुम्हाला. पॅडी भाऊ म्हणाले, जान्हवी माझी प्रार्थना आहे. तुम्ही फार मोठ्या अभिनेत्री व्हा. ज्या चित्रपटात पॅडी असतील त्या सिनेमात काम करणार नाही, एवढ्या मोठ्या व्हा. पॅडी भाऊंनीही तेव्हाच ठरवलं तुम्ही ज्या सिनेमात काम करणार, त्या सिनेमात मी काम करणार नाही. हा त्यांचा राग होता. नंतर ते म्हणाले, मीही भाऊ आहे. बाप आहे. माफ केलं. हा त्यांचा मोठेपणा आहे. जान्हवी, तुम्हाला वयाशीही काही घेणं देणं नाही. तुम्ही सीनियर कलाकारांचा अपमान करता, पण काही यंग कलाकारांचाही अपमान करता. कलाकार हा कलाकार असतो. सीनिअर असो की मोठा तो कलाकारच असतो. याचाच तुम्हाला विसर पडला, अशा शब्दात त्यांनी जान्हवीला फटाकरलं.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.