‘सुची’च्या खऱ्याखुऱ्या ‘फॅमिली मॅन’ विरोधात पहिली पत्नी कोर्टात, प्रियमणी-मुस्तफाचा विवाह बेकायदेशीर असल्याचा दावा

प्रियमणी आणि मुस्तफा राज यांचा विवाह ऑगस्ट 2017 मध्ये झाला. मात्र त्याआधी आपला मुस्तफाशी विवाह झाल्याचा दावा आयेशाने केला आहे. मुस्तफा राज आणि आयेशा यांना दोन मुलं आहेत.

'सुची'च्या खऱ्याखुऱ्या 'फॅमिली मॅन' विरोधात पहिली पत्नी कोर्टात, प्रियमणी-मुस्तफाचा विवाह बेकायदेशीर असल्याचा दावा
प्रियमणी आणि मुस्तफा राज

मुंबई : ‘द फॅमिली मॅन’ (The Family Man) या वेब सीरीजमधील सुचीच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियमणी (Priyamani) हिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी गंभीर आरोप होत आहेत. प्रियमणी आणि मुस्तफा राज (Mustafa Raj) यांचा विवाह बेकायदेशीर असल्याचा दावा त्याच्या पहिल्या पत्नीने केला आहे. मुस्तफाची पहिली पत्नी आयेशाने (Ayesha) आपला अद्याप घटस्फोट झाला नसल्याचा दावा केला आहे.

प्रियमणी आणि मुस्तफा राज यांचा विवाह ऑगस्ट 2017 मध्ये झाला. मात्र त्याआधी आपला मुस्तफाशी विवाह झाल्याचा दावा आयेशाने केला आहे. मुस्तफा राज आणि आयेशा यांना दोन मुलं आहेत. आयेशाने पती मुस्तफाविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रारही दाखल केली आहे. प्रियमणीने याविषयी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.

आयेशाचा दावा काय?

“मुस्तफा आणि मी अजूनही विवाहबंधनात आहोत. प्रियमणी आणि मुस्तफा यांचं लग्न बेकायदेशीर ठरतं. आम्ही अद्यापही घटस्फोटाचा खटला दाखल केलेला नाही. मुस्तफाने मात्र तो अविवाहित असल्याचा दावा केला आहे” अशी प्रतिक्रिया आयेशाने दिल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

मुस्तफा राजचं म्हणणं काय?

“माझ्यावरील आरोप धादांत खोटे आहेत. मी मुलांच्या देखभालीचा खर्च आयेशाला नियमितपणे देत आहे. ती फक्त पैसे उकळण्याची संधी शोधत आहे.” अशी प्रतिक्रिया मुस्तफा राजने दिल्याचा उल्लेख संबंधित बातमीत आहे. “2010 पासून आम्ही विभक्त राहत आहोत. 2013 मध्ये आमचा घटस्फोट झाला. ऑगस्ट 2017 मध्ये मी प्रियामणीशी विवाह केला. इतकी वर्ष आयेशा का गप्प होती?” असा उलट प्रश्न मुस्तफाने विचारला आहे.

प्रियमणीचे फोटो पाहा

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Mani Raj (@pillumani)

कोण आहे प्रियमणी? 

37 वर्षीय अभिनेत्री प्रियमणी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्ल्याळम अशा चारही भाषांतील सिनेमांमध्ये काम केलं आहे. ऐश्वर्या रायची भूमिका असलेला रावण, रक्तचरित्र, अतीत अशा मोजक्या हिंदी चित्रपटात ती झळकली आहे. चेन्नई एक्स्प्रेसमधील वन-टू-थ्री-फॉर या गाण्यात प्रियमणीचं दर्शन घडलं होतं. फॅमिली मॅन या मनोज वाजपेयीची मुख्य भूमिका असलेल्या अॅमेझॉनवरील वेब सीरिजच्या निमित्ताने ती ओटीटीवर दिसली. सुचीच्या भूमिकेमुळी ती लोकप्रियतेच्या शिखरावर गेली. प्रियमणी ही बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिची चुलत बहीण आहे.

संबंधित बातम्या :

‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्री प्रियमणी विद्या बालनची बहीण, एकमेकींच्या बाँडिंगबद्दल सांगताना म्हणाली…

The Family Man 2 Trailer | नव्या पात्रांचा भरणा, श्रीकांतचा नवा जॉब, फॅमिली मॅन 2 चा धमाकेदार ट्रेलर

(The Family Man Actress Priyamani’s marriage with Mustafa Raj is illegal claims first wife Ayesha)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI