The Family Man 2 Trailer | नव्या पात्रांचा भरणा, श्रीकांतचा नवा जॉब, फॅमिली मॅन 2 चा धमाकेदार ट्रेलर

'द फॅमिली मॅन 2' या अ‍ॅक्शन स्पाय थ्रिलरमध्ये श्रीकांतच्या मुख्य भूमिकेत अभिनेता मनोज बाजपेयी झळकणार आहे (The Family Man 2 Official Trailer )

The Family Man 2 Trailer | नव्या पात्रांचा भरणा, श्रीकांतचा नवा जॉब, फॅमिली मॅन 2 चा धमाकेदार ट्रेलर
The Family Man 2 Official Trailer


मुंबई : अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची ओरिजिनल वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ने (The Family Man 2) प्रेक्षकांच्या मनात अशी काही छाप सोडली की, प्रेक्षक आता त्याच्या दुसर्‍या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांचा तोच उत्साह आणि प्रेम पाहून मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) ची मुख्य भूमिका असलेल्या ‘द फॅमिली मॅन’ चा दुसरा सीझन आणण्यात आला आहे. 4 जून रोजी ही सीरीज रिलीज होणार असून नुकताच धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. (The Family Man Season 2 Official Trailer starring Manoj Bajpayee web series latest update release date)

‘द फॅमिली मॅन 2’ शोच्या आशयामध्ये बरीच काट-छाट झाली आहे. पण यात कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत. अ‍ॅमेझॉनने ‘द फॅमिली मॅन 2’ सुरुवातीपासून अगदी निरखून पाहिला आहे, जेणेकरून राजकीयदृष्ट्या कुठलीही अडचण होणार नाही, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये बोलले जाते.

तगडी स्टारकास्ट

‘द फॅमिली मॅन 2’ या अ‍ॅक्शन स्पाय थ्रिलरमध्ये साहजिकच श्रीकांतच्या मुख्य भूमिकेत अभिनेता मनोज बाजपेयी झळकणार आहे. या व्यतिरिक्त समन्था अक्कीनेनी, सुचीच्या भूमिकेत प्रियमणी, शारीब हाश्मी, सीमा विश्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

टीझरला उत्स्फूर्त प्रतिसाद

मनोज बाजपेयीची वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ 2019 मध्ये प्रदर्शित झाली होती. या वेब सीरीजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर या वेब सीरीजचा सीझन 2 आणण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘द फॅमिली मॅन 2’च्या टीझरने देखील भरपूर वाहवा मिळवली. या टीझरमध्ये मनोजची बदललेली स्टाईल पाहायला मिळाली होती. यावेळी प्रेक्षक मोशे जिवंत आहेत की, मृत हे जाणून घेण्याची प्रतीक्षा करत आहेत. या सीरीजमध्ये क्रूर दहशतवादी मुसाची भूमिका अभिनेता नीरज माधव यांनी साकारली होती. या भूमिकेसाठी नीरजला बरीच वाहवा मिळाली होती.

पाहा व्हिडीओ :

हेही वाचा :

Net Worth | महागड्या गाड्यांची आवड, करोडोंच्या संपत्तीचा मालक, वाचा ‘डार्लिंग’ प्रभासबद्दल…

Sherni : लवकरच ‘शेरनी’चा ग्लोबल प्रीमियर, विद्या बालन झळकणार मुख्य भूमिकेत

(The Family Man 2 Official Trailer)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI