The Family Man 2 :  मनोज बाजपेयीचा अ‍ॅक्शन पॅक ‘द फॅमिली मॅन 2’ ‘या’ दिवशी रिलीज होणार, ट्रेलरही लवकरच भेटीला येणार!

The Family Man 2 :  मनोज बाजपेयीचा अ‍ॅक्शन पॅक ‘द फॅमिली मॅन 2’ ‘या’ दिवशी रिलीज होणार, ट्रेलरही लवकरच भेटीला येणार!
'द फॅमिली मॅन 2'

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची ओरिजिनल वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ने प्रेक्षकांच्या मनात अशी काही छाप सोडली की, लोक आता त्याच्या दुसर्‍या सत्राची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Harshada Bhirvandekar

|

May 17, 2021 | 7:07 PM

मुंबई : अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची ओरिजिनल वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ने प्रेक्षकांच्या मनात अशी काही छाप सोडली की, लोक आता त्याच्या दुसर्‍या सत्राची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांचा तोच उत्साह आणि प्रेम पाहून निर्मात्यांनी मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) अभिनीत सीरीज ‘द फॅमिली मॅन’ चा दुसरा सीझन जाहीर (The Family Man 2 ) केला, जो फेब्रुवारी 2021 मध्ये रिलीज होणार होता. पण, काही कारणास्तव तो ठरल्या वेळेत रिलीज होऊ शकला नाही. मात्र, आता हा वेब शो जून महिन्यात रिलीज होणार आहे (Manoj Bajpayee The Family Man 2 web series latest update release date).

मनोज बाजपेयीची अ‍ॅक्शन जासूस थ्रिलर ‘फॅमिली मॅन 2’ ही वेबसीरीज 4 ते 11 जून दरम्यान प्रदर्शित केली जाईल. या शोचा ट्रेलर 19 मे रोजी रिलीज होणार असून, याचवेळी प्रदर्शनाच्या तारखेची अधिकृत घोषणाही होईल.

रिलीज न करण्याचे कारण काय?

वास्तविक, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओला कोणत्याही वाद किंवा राजकीय विषयात उतरायचे नव्हते, म्हणून रिलीज होण्यापूर्वी अ‍ॅमेझॉनने शोचे स्वत:च्या मार्गाने पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणूनच फेब्रुवारीमध्ये हा सीजन प्रदर्शित करण्यात आला नाही. मात्र, आता बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार अ‍ॅमेझॉनने ‘द फॅमिली मॅन 2’ला कोणताही कट न देता ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूड हंगामाच्या या वृत्तात असेही म्हटले आहे की, “शोच्या आशयामध्ये बरीच काट-छाट झाली आहेत. पण यात कोणतेही मोठे बदल झाले नाहीत. अ‍ॅमेझॉनने ‘द फॅमिली मॅन 2’ सुरुवातीपासून अगदी निरखून पाहिली आहे, जेणेकरून राजकीयदृष्ट्या देखील काहीही चुकीचे होणार नाही.”(Manoj Bajpayee The Family Man 2 web series latest update release date)

तगडी स्टारकास्ट

या अ‍ॅक्शन स्पाय थ्रिलर ‘द फॅमिली मॅन 2’मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी व्यतिरिक्त सामन्था अक्केनेनी, प्रियामनी, शारिब हाश्मी, सीमा बिश्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

टीझरला उत्स्फूर्त प्रतिसाद

मनोज बाजपेयी यांची वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन 2’ वर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झाली. या वेब सीरीजला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या वेब सीरीजचा सीझन 2 आणण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘द फॅमिली मॅन 2’च्या टीझरने देखील भरपूर वाहवा मिळवली. या टीझरमध्ये मनोजची बदललेली स्टाईल पाहायला मिळाली होती. यावेळी प्रेक्षक मोशे जिवंत आहेत की, मृत हे जाणून घेण्याची प्रतीक्षा करत आहेत. या सीरीजमध्ये क्रूर दहशतवादी मूसाची भूमिका अभिनेता नीरज माधव यांनी साकारली होती. या भूमिकेसाठी नीरजला बरीच वाहवा मिळाली होती.

(Manoj Bajpayee The Family Man 2 web series latest update release date)

हेही वाचा :

Net Worth | महागड्या गाड्यांची आवड, करोडोंच्या संपत्तीचा मालक, वाचा ‘डार्लिंग’ प्रभासबद्दल…

Sherni : लवकरच ‘शेरनी’चा ग्लोबल प्रीमियर, विद्या बालन झळकणार मुख्य भूमिकेत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें