Net Worth | महागड्या गाड्यांची आवड, करोडोंच्या संपत्तीचा मालक, वाचा ‘डार्लिंग’ प्रभासबद्दल…

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) याने आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्वात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ भारतच नव्हे तर जगभरात त्याचे चाहते आहेत.

Net Worth | महागड्या गाड्यांची आवड, करोडोंच्या संपत्तीचा मालक, वाचा ‘डार्लिंग’ प्रभासबद्दल...
प्रभास
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 4:17 PM

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) याने आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्वात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ भारतच नव्हे तर जगभरात त्याचे चाहते आहेत. ‘बाहुबली’ या चित्रपटापासून प्रभासला जगभरात प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटामुळे प्रभास जगभरात ओळखला जाऊ लागला. त्याच्या बाहुबली या सीरीजने प्रभासला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. ‘बाहुबली’नंतर प्रभासचे नाव इंडस्ट्रीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीत सामील झाले आहे (Actor Prabhas luxurious life and his net worth).

कलाकारांनाही त्यांची जीवनशैली अतिशय काटेकोरपणे सांभाळावी लागते. इतर कलाकारांप्रमाणेच प्रभास देखील ‘लक्झरी’ आयुष्य जगतो. त्यांच्याकडे कोट्यवधींची वाहने आहेत. याशिवाय एक महागडा बंगला आणि बर्‍याच ब्रँड्स एंडोर्समेंट देखील आहेत, ज्यासाठी त्याला चांगले मानधन मिळते. प्रभासकडे जवळपास 190 कोटींची संपत्ती आहे.

महागड्या गाड्यांचा शौक

प्रभासला लक्झरी कारची खूप आवड आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्यांचा संग्रह देखील आहे. सर्वात महागडी कार रोल्स रॉयस फॅंटमचा देखील मालक आहे. या कारची किंमत तब्बल 8 कोटी आहे. याशिवाय त्यांच्याकडे रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू एक्स 3, जॅग्वार आणि स्कोडा सुपर्बही आहेत. प्रभास अनेकदा आपली ‘फॅन्टम’ कार ड्राईव्ह करताना दिसतो.

हैदराबादमध्ये लक्झरी बंगला

हैदराबादच्या महागडा भाग जुबली हिल्समध्ये प्रभासचा लक्झरी बंगला आहे. ज्याची किंमत कोटींमध्ये आहे. वृत्तानुसार या बंगल्याची किंमत 60 कोटी आहे. 2014मध्ये प्रभासने हा बंगला खरेदी केला होता. प्रभासच्या या घरात स्विमिंग पूल, जिम, थिएटर, स्पोर्ट्स एरिया अशा सर्व काही सुखसोयी उपलब्ध आहेत (Actor Prabhas luxurious life and his net worth).

सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता

बाहुबलीपासून प्रभासने आपले मानधन वाढवले आहे. बाहुबलीच्या दोन भागांसाठी त्याने 25 कोटी रुपये मानधन घेतले होते. त्यानंतर जेव्हा त्याचा पॅन इंडिया चित्रपट ‘साहो’ प्रदर्शित झाला, तेव्हा त्याने आपले मानधन वाढवले आणि 30 कोटी रुपये घेतले.

सर्वाधिक कर भरणारा कलाकार

सर्वाधिक कर भरणाऱ्या कलाकारांच्या यादीत प्रभासचे नाव समाविष्ट आहे. तो दरवर्षी सुमारे 7 कोटी रुपये कर भरतो. वृत्तानुसार प्रभास यांच्याकडे 190 कोटींची संपत्ती आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, प्रभास लवकरच ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो ‘रामा’च्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ अली खान आणि कृती सेनॉन ‘आदिपुरुष’मध्ये प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

(Actor Prabhas luxurious life and his net worth)

हेही वाचा :

Nick Jonas | प्रियंकाचे टेन्शन वाढले, निक जोनास रुग्णालयात दाखल, वाचा नेमकं काय झालं?

Photo : दिव्यांका त्रिपाठीची केपटाऊनमध्ये धमाल, सोशल मीडियावर फोटो शेअर

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.