पाकिस्तान सरकारची कारवाई, दिलीपकुमार-राज कपूर यांच्या हवेली मालकांना अखेरची नोटीस!

बॉलीवूड अभिनेते राज कपूर (Raj Kpoor) आणि दिलीप कुमार (Dilipkumar) यांची पाकिस्तानतील किस्सा ख्वानी बाजारात पेशावर येथे असलेली वडिलोपार्जित हवेली गेल्या काही काळापासून बरीच चर्चेत आहे.

पाकिस्तान सरकारची कारवाई, दिलीपकुमार-राज कपूर यांच्या हवेली मालकांना अखेरची नोटीस!
राज कपूर आणि दिलीप कुमार
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 10:43 AM

मुंबई : बॉलीवूड अभिनेते राज कपूर (Raj Kpoor) आणि दिलीप कुमार (Dilipkumar) यांची पाकिस्तानतील किस्सा ख्वानी बाजारात पेशावर येथे असलेली वडिलोपार्जित हवेली गेल्या काही काळापासून बरीच चर्चेत आहे. वृत्तानुसार, त्यांचा ताबा घेण्याची प्रक्रिया पाकिस्तान सरकारने औपचारिकरित्या सुरू केली आहे. पाकिस्तान सरकारनेही यासाठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे (Pakistan Government sent final notice to Raj Kapoor and Dilipkumar haveli owners).

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील सरकारने बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांची औपचारिक ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जेणेकरुन त्यांचे संग्रहालये रूपांतरित होऊ शकतील. यासाठी मे अखेरीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

नोटीस पाठवली

पेशावरचे उपायुक्त खालिद मेहमूद यांनी बुधवारी ऐतिहासिक इमारतींच्या सध्याच्या मालकांना अंतिम नोटीस बजावली आणि 18 मे रोजी त्यांना पुढील कारवाईसाठी बोलवले आहे. खैबर पख्तूनख्वा (केपी) सरकारने ठरवलेल्या हवेलींच्या किंमतींवर मालक आपले आरक्षण सादर करू शकतात. या संदर्भात, प्रांतीय सरकार किंवा कोर्ट हवेलीच्या किंमती वाढवू शकतात.

पेशावरचे उपायुक्त खालिद मेहमूद यांनी बुधवारी हवेलीच्या सध्याच्या मालकाला अखेरची नोटीस पाठवली आहे. तसेच, सरकारने 18 मेपर्यंत निश्चित केलेल्या किंमतींच्या आधारे त्यांचे आरक्षण सादर करण्यास सांगितले आहे (Pakistan Government sent final notice to Raj Kapoor and Dilipkumar haveli owners).

किंमतींमुळे मालक नाखूष

तत्पूर्वी, राज कपूरच्या हवेलीसाठी 6 मार्ला घर आणि दिलीप कुमारांचे 4 मार्ला घर 1.50 कोटी आणि 80 लाख रुपयांमध्ये खरेदी करून, त्यांचे संग्रहालय बनवण्याची योजना सरकारने आखली होती. अशा परिस्थितीत राज कपूरच्या हवेलीचा मालक अली कादिर यांनी या हवेलीसाठी 20 कोटींची मागणी केली होती, तर दिलीपकुमारच्या हवेलीचे मालक गुल रेहमान मोहम्मद म्हणाले होते की, सरकारनी ती बाजार दरावर खरेदी करावी, म्हणजे जवळपास 3.50 कोटी रुपये आहे.

संग्रहालय बनवणार!

त्याचबरोबर, खैबर पख्तूनख्वा पुरातत्व आणि संग्रहालये विभागाचे संचालक डॉ. अब्दुल समद यांनी सांगितले की, दोन्ही घरे ताब्यात घेतल्यानंतर ईद-उल-फितरनंतर जीर्णोद्धाराचे काम केले जाईल. कपूर हवेली म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांचे वडिलोपार्जित घर किस्सा खवानी बाजारात आहे. राज कपूर यांचे आजोबा दीवान बशेश्वरनाथ कपूर यांनी 1918 दरम्यान तयार केले होते. या इमारतीत राज कपूर आणि त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म झाला होता. अशा परिस्थितीत आता या घराचे संग्रहालय बनवण्याची तयारी सुरू झाली आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे 100 वर्ष जुने वडिलोपार्जित घरही याच भागात आहे. हे घर आता जीर्ण झाले आहे आणि 2014मध्ये नवाज शरीफ सरकारने त्याला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले होते.

(Pakistan Government sent final notice to Raj Kapoor and Dilipkumar haveli owners)

हेही वाचा :

तब्बल 17 वर्षांनी प्रदर्शित झाला रणबीर कपूरचा पहिला चित्रपट, ऑस्करमध्येही मिळाले होते नामांकन!

Video | रश्मी देसाईचा छोट्या स्कर्टमध्ये हॉट डान्स, व्हिडीओ पाहून चाहते नाराज

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.