Parineeti Chopra-Raghav Chaddha : परिणीती-राघवमध्ये मोठं कोणं ? जास्त संपत्ती कोणाकडे ? जाणून घ्या नेटवर्थ
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी नेता राघव चढ्ढा या दोघांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं, नुकतेच ते आई-बाबा बनले. त्या दोघांमध्ये वयाचं अंतर किती आहे, आणि त्यांचं नेटवर्थ किती, जास्त श्रीमंत कोण ?

बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्री परिणीची चोप्रा आणि राघव चढ्ढा , दोघे पॉप्युलर जोडपं आहे. परिणीती सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. नुकतीच तिने एका गोड बाळाला जन्म दिला असून परिणीती- राघव आई-बाबा बनले आहेत. त्यांच्या घरात मुलाचे आगमन झाले. या गुड न्यूजमुळे अनेक सेलिब्रिटी तसेच चाहतेही दोघांना भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत. पण परिणीती आणि राघव या दोघांमध्ये वयाचं किती अंतर आहे , त्यांचं नेटवर्थ किती आणि कोण जास्त श्रीमंत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ? चला त्यांच्या बद्दल जाणून घेऊया रंजक माहिती.
परिणीती-राघवमध्ये मोठं कोणं ?
परिणीती-राघवमध्ये मोठं कोणं ? हे अनेकांना माहीत नसेल. परिणीतीचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 साली झाला तर तिच पती, राजकारणी राघव चढ्ढा यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1988 साली झाला. त्यामुळे परिणीती ही राघवपेक्षा 20 दिवसांनी मोठी आहे. तर परीणीतीप्रमाणेच आता त्यांचं बाळ, त्यांचा मुलगा हाही ऑक्टोबरमधला असून दोघांचाही वाढदिवस एकाच महिन्यात असेल.
परिणीती चोप्राचं नेटवर्थ आणि कमाई
एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर, परिणीती चोप्राची बॉलिवूडमध्ये यशस्वी कारकीर्द होती. डीएनएच्या रिपोर्टुनासर, तिची एकूण संपत्ती 74 कोटी रुपये आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडिया कोलॅबमधून ती बरीच कमाई करते. तसेच मुंबई तिच्या मालकीचा 22 कोटींचा एक सी-फेसिंग फ्लॅट आहे. तसेच तिच्याकडे जग्वार, ऑडी आणइ रेंज रोव्हरसारख्या महागड्या गाड्याही आहेत.
View this post on Instagram
राघव चड्ढाची संपत्ती आणि कमाई
राजकीय नेत असलेल्या राघव चढ्ढा बद्दल सांगायचं झाल तर त्याची एकूण घोषित संपत्ती खूप कमी आहे. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, राघवकडे फक्त 0 लाख रुपयांची मालमत्ता आहे, ज्यामध्ये दिल्लीतील 36-37 लाख रुपयांचे घर, 5 लाख रुपयांचे 90 ग्रॅम सोने आणि शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवलेले सुमारे 6 लाख रुपये यांचा समावेश आहे. तसेच ते मारुती सुझुकी सिफ्ट डिझायर ही गाडी चालवतात.
View this post on Instagram
पहिली भेट कशी झाली ?
राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांची पहिली भेट लंडनमधील एका पुरस्कार सोहळ्यात झाली. परिणीतीने खुलासा केला होता की, तिचा धाकटा भाऊ राघवचा चाहता आहे आणि त्याने तिला राघवला भेटायला सांगितलं होतं. दोघांची भेट झाली, ओळख वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 2023 साली त्यांनी राजस्थानमध्ये शानार सोहळ्यात लग्न केलं.
