AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parineeti Raghav Wedding | परिणीती-राघवचा स्वप्नवत लग्नसोहळा; ‘नवीन सुरुवात’ म्हणत अभिनेत्रीकडून फोटो पोस्ट

परिणीती आणि राघव चड्ढाच्या लग्नाचे फोटो अखेर समोर आले आहेत. परिणीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर बहीण प्रियांका चोप्राने सर्वांत आधी कमेंट केली. 24 सप्टेंबर रोजी हे दोघं उदयपूरमध्ये लग्नबंधनात अडकले.

Parineeti Raghav Wedding | परिणीती-राघवचा स्वप्नवत लग्नसोहळा; 'नवीन सुरुवात' म्हणत अभिनेत्रीकडून फोटो पोस्ट
Parineeti Chopra and Raghav Chadha Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 25, 2023 | 10:23 AM
Share

उदयपूर | 25 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी रविवारी 24 सप्टेंबर रोजी लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील उदयपूर इथल्या ‘द लीला पॅलेस’मध्ये हा लग्नसोहळा पार पडला. रविवारी दिवसभर चाहते या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची प्रतीक्षा करत होते. मात्र आता सोमवारी सकाळी परिणीती आणि राघवच्या लग्नाचे सुंदर फोटो समोर आले आहेत. सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये लग्नासाठी ‘पेस्टल’ रंगांचा थीम ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे परिणीतीच्या लग्नातही हाच ट्रेंड पहायला मिळाला. परिणीतीने मोती रंगाचा भरजरी लेहंगा परिधान केला. तर राघवनेही त्याच रंगसंगतीचा शेरवानी घातला होता. दोघांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

लग्नाचे फोटो पोस्ट करत परिणीतीने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘नाश्त्याच्या टेबलवरील पहिल्या गप्पांपासूनच आम्हाला माहीत होतं की आम्ही एकमेकांसाठीच आहोत. या दिवसाची प्रतीक्षा आम्ही खूप काळापासून केली. अखेर आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकलो नसतो. इथपासून आमच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.’

पहा लग्नाचे फोटो

View this post on Instagram

A post shared by @parineetichopra

या फोटोंमध्ये परिणीती आणि राघव यांचं पाहुण्यांकडून जल्लोषात स्वागत होताना पहायला मिळतंय. तर दुसऱ्या फोटोमध्ये राघव परिणीतीच्या गळ्यात वरमाळा घालताना दिसत आहे. सप्तपदी घेताना आणि पायात जोडवे घालतानाचेही फोटो परिणीतीने पोस्ट केले आहेत. आपल्या चुलत बहिणीच्या लग्नाला अभिनेत्री प्रियांका चोप्रा हजर राहू शकली नव्हती. मात्र लग्नाआधी तिने परिणीतीसाठी खास पोस्ट लिहिला होता. आता या लग्नाच्या फोटोंवर सर्वांत आधी प्रियांकानेच कमेंट केली. ‘माझा तुम्हाला सदैव आशीर्वाद असेल’, असं तिने लिहिलं आहे.

नीना गुप्ता, सानिया मिर्झा, गुल पनाग, मनिष मल्होत्रा, निम्रत कौर, अनिता हसनंदानी यांसारख्या सेलिब्रिटींनी परिणीती आणि राघववर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यावर्षी मे महिन्यात परिणीती आणि राघवने साखरपुडा केला. या साखरपुड्याला बॉलिवूड इंडस्ट्री आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.