AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते सर्वांच्या आयुष्यात हास्य..; असरानी यांच्या निधनानंतर मोदींची भावूक पोस्ट

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली वाहिली. असरानी यांचं सोमवारी मुंबईत निधन झालं. ते 84 वर्षांचे होते.

ते सर्वांच्या आयुष्यात हास्य..; असरानी यांच्या निधनानंतर मोदींची भावूक पोस्ट
Narendra Modi and AsraniImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 21, 2025 | 1:20 PM
Share

‘हम अंग्रेजो के जमाने के जेलर है..’ यासारखे डायलॉग आणि विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेले लोकप्रिय अभिनेते गोवर्धन असरानी यांचं सोमवारी मुंबईत निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते विविध व्याधींनी त्रस्त होते. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझ इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. असरानी गेल्या पाच दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 350 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. असरानी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही असरानी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मोदींची पोस्ट-

‘श्री गोवर्धन असरानी यांच्या निधनाने खूप दु:ख झालं. एक प्रतिभावान आणि खरोखरच विविधांगी भूमिका साकारणारे कलाकार. त्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयकौशल्याने असंख्य लोकांच्या आयुष्यात आनंद आणि हास्य भरलं. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान नेहमीच जपलं जाईल. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती,’ असं त्यांनी लिहिलंय.

जयपूरमध्ये गुजराती कुटुंबात जन्मलेल्या गोवर्धन असरानी यांनी पुण्यातील ‘एफटीआयआय’मधून (FTII) अभिनयाचं शिक्षण घेतलं. 1967 मध्ये त्यांना ‘हरे काँच की चुडियाँ’ या हिंदी चित्रपटात पहिली भूमिका मिळाली. त्यानंतर त्यांनी काही गुजराती चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. 1970 च्या उत्तरार्धात असरानी यांच्या कारकिर्दीची लोकप्रियतेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. ‘आज की ताजा खबर’, ‘रोटी’, ‘चुपके चुपके’, ‘छोटी सी बात’, ‘रफू चक्कर’, ‘शोले’, ‘पती पत्नी और वो’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या. ‘शोले’ चित्रपटातील त्यांची चार्ली चॅप्लिनच्या पेहरावातील जेलरची भूमिका आणि डायलॉग्स लोकप्रिय ठरले. 1971 मध्ये ‘मेरे अपने’मधील असरानी यांच्या भूमिकेनं प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. 1972 ते 1991 या काळात त्यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत 25 चित्रपट केले.

असरानी यांच्या कामाचा झपाटा इतका अधिक होता की सत्तर ते ऐंशीच्या दशकात नायकांची पिढी बदलत गेली तर असरानींचं चित्रपटातील स्थान आणि त्यांच्या भूमिका या दोन्हीला धक्का लागला नाही.  त्यांच्यासारख्या अनुभवी अभिनेत्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या काळाचा साक्षीदार आणि विनोदाचा हुकुमी एक्का हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.