AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan Case : सैफचं रक्त आणि ‘त्या’ कपड्यांमुळे होणार मोठा खुलासा, प्रकरणाचा होणार पर्दाफाश

Saif Ali Khan Case : सैफ अली खान याचं रक्त आणि 'त्या' कपड्यांमुळे मोठं सत्य येणार समोर, पोलिसांच्या महत्त्वाच्या तपासानंतर प्रकरणाचा होणार पर्दाफाश, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान हल्ला प्रकरणाची चर्चा...

Saif Ali Khan Case : सैफचं रक्त आणि 'त्या' कपड्यांमुळे होणार मोठा खुलासा,  प्रकरणाचा होणार पर्दाफाश
सैफ अली खान
| Edited By: | Updated on: Jan 25, 2025 | 2:20 PM
Share

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. सैफ अली खान याच्या प्रकरणात हल्ला करणारा खरा आरोपी शरीफुल शहजाद आहे की नाही यावर खुलासा झालेला नाही. 16 जानेवारी मध्यरात्री सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरात घुसखोरी करत सैफ याच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर अभिनेता गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर याप्रकरणी तात्काळ तपास सुरु झाला आहे. पोलिसांनी शरीफुल शहजाद याला अटक केली आहे. पण त्याच्यावरील आरोप सिद्ध झालेला नाही. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली, मात्र अखेर शरीफुल हाच खरा हल्लेखोर मानला जात आहे.

पण सीसीटीव्हीमध्ये दाखवलेल्या व्यक्तीचा चेहरा आणि शरीफुलचा चेहरा जुळत नसल्याचे आरोपीच्या वकिलाचे म्हणणे आहे. आता पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा नवा मार्ग शोधला आहे. प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी पुरावा जमा करण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानने त्या रात्री घातलेले कपडे आणि त्याच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये (एफएसएल) पाठवण्यात आले आहेत. या तपासातून पोलिसांना हल्लेखोराच्या कपड्यांवर दिसणारे रक्ताचे डाग सैफचे असल्याचे सिद्ध करायचे आहे. पोलिसांनी अनेकांचे फिंगरप्रिंट्स घेतले आहेत.

सैफ अली खान घटनेबद्दल काय म्हणाला?

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी सैफ अली खान याचा जबाब नोंदवला आहे. ‘मदतनीसचा किंचाळल्याचा आवज आल्यानंतर मी आणि करीना बेडरूममध्ये होतो. मी हल्लेखोराला पकडल्यानंतर त्याने माझ्यावर वार केले. सध्या कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जेहच्या रुममध्ये तो घुसला होता. तेव्हा स्टॉफने जेहला रुम बाहेर काढलं.’ सैफ याच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी करीनाचा देखील जबाब नोंदवला आहे.

सैफ अली खान याची प्रकृती कशी ?

लिलावती रुग्णालयातील अभिनेत्याला 21 जानेवारी रोजी डिस्चार्ज मिळाला आहे. सैफची प्रकृती आता स्थिर असली तरी अभिनेत्याला महिना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अभिनेत्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफच्या कुटुंबियांनी आणि चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. आता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.