पोलीस चौकशीला रणवीर अलाहाबादिया गेलाच नाही;अखेर मुंबई पोलिसांनी घेतली पुढची अॅक्शन
पोलिसांनी आतापर्यंत युट्यूबर रणवीर इलाहाबादियाला दोन समन्स पाठवले आहे. मात्र तो चौकशीला हजर राहिलाच नाही उलट त्यानेच पोलिसांना एक विनंती केली जी पोलिसांनी थेट फेटाळून दिली. आणि त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहावच लागेल अशी तंबी दिली आहे.

युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ मध्ये पालकांवरू केलेल्या अश्लील विनोदावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. हा वाद इतका वाढला आहे की त्याच्यावर आणि समय रैनावर चक्क अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तसेच या दोघांसोबतच शोच्या इतर सदस्यांचीही चौकशी सुरु आहे. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. एक एक करून सर्वांनाच पोलीस चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवत आहेत.
मुंबई पोलिसांनी रणवीरलाही चौकशीसाठी बोलावले होते, मात्र तो पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहिलाच नाही. त्याला दुसऱ्यांदा बोलावण्यात आलं असून पोलिसांना एक विनंती केली जी पोलिसांनी फेटाळून लावली आहे.
रणवीरची विनंती पोलिसांनी फेटाळली
एका रिपोर्टनुसार रणवीरने खार पोलिसांना त्याच्या जबाब नोंवण्यासाठी, त्याची चौकशी करण्यासाठी त्याच्या निवासस्थानी येण्याची विनंती केली. मात्र मुंबई पोलिसांनी त्याची ही विनंती फेटाळून लावली. पोलिसांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला आहे आणि रणवीरला खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहावंच लागणार असल्याचं म्हटलं आहे.
पोलिसांनी रणवीरला दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स पाठवलं . बुधवारी तत्पूर्वी, पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं, मात्र तो हजर झाला नाही. त्याने आधीच्या समन्सलाही प्रतिसाद दिला नव्हता.
शो स्क्रिप्टेड होता का? अपूर्वाचीही चौकशी झाली
पोलिसांनी सोशल मीडिया इंफ्लुएंसर आणि या शोचा भाग राहिलेली अपूर्व माखीजाचीही चौकशी केली. इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये जाण्यासाठी त्यांना पैसे देण्यात येतात का? किंवा शोसाठी काही स्क्रिप्ट देण्यात येते का? असे प्रश्न विचारले जातात.
अपूर्वाने मुंबई पोलिसांना सांगितले होते की हा शो स्क्रिप्टेड नाहीये. या शोमध्ये येणाऱ्या कोणालाही शोसाठी पैसे मिळत नाहीत. शोचा विषय असा आहे की कोणत्याही बंधनाशिवाय बोलणे. त्यावर ज्या काही प्रतिक्रिया येतात त्या सर्व नैसर्गिक असतात असंही तिने सांगितलं.
प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले
समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शोमधील अश्लील विनोदांना प्रचंड विरोध होत आहे. एका एपिसोडच्या जज पॅनलचा भाग असलेला रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा यांनी पालकांबाबतच्या काही अश्लील गोष्टी शोमध्ये बोलल्या ज्यामुळे बराच गोंधळ उडाला आणि हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. तसेच हा शो किंवा अशा काही शोसारखे इतर शो बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वैयक्तिक सोशल मीडिया हँडलवरून देखील व्हिडीओ काढले
दरम्यान रणवीरने या प्रकरणाबाबत आधीच माफी मागितली असली तरीही हा वाद थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीयेत. तसेच समयने सर्व व्हिडीओ यूट्यूबवरून काढून टाकले आहेत. तसेच त्याने सांगितले की प्रत्येक कारवाईला तो पूर्ण सहकार्य करेल. रणवीर, अपूर्वा आणि समय यांच्या वैयक्तिक सोशल मीडिया हँडलवरून देखील शोशी संबंधित रील्स काढून टाकण्यात आले आहेत.
