मन्नारा चोप्रावर कमेंट केल्याने विकी जैनवर भडकली आलिया भट्टची बहीण; म्हणाली “स्वत:ला जेंटलमन…”

बिग बॉसने विशेष अधिकार देताच टीम ‘अ’ने टीम ‘ब’मधील सर्व स्पर्धकांना नॉमिनेट केलं. यामध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, इशा मालवीय आणि आयेशा खान यांचा समावेश होता. पुढच्या एलिमिनेशन राऊंडसाठी या चौघांना नॉमिनेट करण्यात आलं आहे.

मन्नारा चोप्रावर कमेंट केल्याने विकी जैनवर भडकली आलिया भट्टची बहीण; म्हणाली स्वत:ला जेंटलमन...
Pooja Bhatt and Vicky JainImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 12:41 PM

मुंबई : 18 जानेवारी 2024 | ग्रँड फिनालेपूर्वी ‘बिग बॉस 17’च्या घरात नवनवीन ट्विस्ट पहायला मिळत आहेत. नुकताच बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये नॉमिनेशन टास्क पार पडला. यावेळी घरातील स्पर्धक दोन टीम्समध्ये विभागले गेले. नॉमिनेशनपासून स्वत:ला वाचवण्यासाठी या स्पर्धकांमध्ये चुरस रंगली होती. या टास्कदरम्यान अंकिता लोखंडेचा पती विकी जैन हा मन्नारा चोप्राला असं काही म्हणाला, ज्यावरून आता अभिनेत्री पूजा भट्ट भडकली आहे. पूजाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित विकीला सुनावलं आहे. शो अंतिम टप्प्यात आला असताना स्पर्धकांमध्ये टॉर्चर टास्क खेळला गेला. या टास्कसाठी ‘अ’ टीममध्ये मुनव्वर फारुखी, अरुण माशेट्टी, अभिषेक कुमार आणि मन्नारा चोप्रा यांचा समावेश होता. तर ‘ब’ टीममध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, आयेशा खान आणि इशा मालवीय होते.

टॉर्चर टास्कदरम्यान मन्नारा आणि अभिषेक हे दोघं मिळून मुनव्वरला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळी अभिषेक मुनव्वरच्या पुढे येऊन उभा राहतो. तर मन्नारा सोफ्याच्या आर्मरेस्टवर बसून मुनव्वरला वाचवण्याचा प्रयत्न करते. मात्र यावेळी ती ज्या पद्धतीने सोफ्यावर बसते, ते पाहून विकी तिच्यावर कमेंट करतो. याच कमेंटवरून आता पूजा भट्टने विकीला सुनावलं आहे. पूजाने सोशल मीडियावर विकीचं नाव न घेता टास्कदरम्यान केलेल्या कमेंटवरून टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

पूजा भट्टची पोस्ट-

पूजाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘तू खूप चुकीच्या पद्धतीने बसली आहेस, असं म्हणत एक पुरुष स्पर्धक मन्नारा चोप्राला सुनावतो. ती फक्त तिच्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करतेय. जेव्हा तुमच्या सर्व गोष्टी फेल ठरतात, तेव्हा तुम्ही महिलेवर टिप्पणी करता आणि मग स्वत:ला जेंटलमन म्हणवता. हे अजिबात कूल नाही.’ टॉर्चर टास्कदरम्यान विकीने मन्नारावर जी कमेंट केली, त्याच्याशीच संबंधित पूजाची ही पोस्ट आहे.

टॉर्चर टास्कच्या दुसऱ्या राऊंडच्या आधी मुनव्वर हा विकीने लपवलेला राशन उचलून घेतो. त्यानंतर विकी भडकतो. तो मुनव्वरच्या दिशेने राशन परत मिळवण्यासाठी जातो. त्याचवेळी अभिषेक आणि मन्नारा मध्ये येतात. मुनव्वरला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना मन्नारा ज्या पद्धतीने बसते, त्यावरून विकी तिला सुनावतो. “एका मुलाच्या मिठीत बसून तुला चांगलं वाटतंय का? हे शोभतंय का? तू कशा पद्धतीने बसली आहेस ते बघ. हे किती घाण वाटतंय. छी छी छी. मन्नारा, तू जर मध्ये आलीस तर तुला धक्का दिला जाईल. तू ज्या पद्धतीने बसली आहेत, ते खूप चुकीचं आहे”, असं विकी तिला म्हणतो. त्याच्या या कमेंटवर पत्नी अंकिता लोखंडे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. मात्र तो तिचंही ऐकत नाही आणि पुढे बोलत राहतो.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.