AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला मारून टाका, फासावर लटकवा पण..’; ट्रोलिंगवर पूनम पांडेनं सोडलं मौन

“मला माफ करा ही मी हे इतकं टोकाचं पाऊल उचललं. पण त्यामुळे अचानक सर्वजण सर्वाइकल कॅन्सरबद्दल चर्चा करू लागले आहेत. त्यामुळे खोटं बोलण्यामागे माझा जो उद्देश होता, तो पूर्ण झाला आहे”, असं म्हणत पूनमने सर्वांना मोठा धक्का दिला होता. सर्वाइकल कॅन्सरच्या जागरुकतेसाठी तिने निधनाची अफवा पसरवली होती.

'मला मारून टाका, फासावर लटकवा पण..'; ट्रोलिंगवर पूनम पांडेनं सोडलं मौन
Poonam PandeyImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 06, 2024 | 9:01 AM
Share

मुंबई : 6 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री पूनम पांडे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. 2 फेब्रुवारी रोजी पूनमच्या निधनाचं वृत्त समोर आलं. त्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी सकाळी पूनमने स्वत:चा व्हिडीओ पोस्ट करत जिवंत असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. सर्वाइकल कॅन्सरविषयी जागरुकता पसरवण्यासाठी मृत्यूचं नाटक केल्याचं पूनमने स्पष्ट केलं. मात्र त्यावरूनच नेटकरी तिच्यावर आणखी भडकले आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण तिच्यावर टीका करत आहेत. यानंतर आता तिने सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट लिहित स्वत:विषयी स्पष्टीकरण दिलं आहे.

“मला मारून टाका, फासावर लटकवा पण..”

दरवर्षी सर्वाइकल कॅन्सरने अनेक महिलांचा मृत्यू होतो. कारण त्याविषयी महिलांमध्ये पुरेशी जागरुकता नाही, असं म्हणत पूनमने स्वत:च्या मृत्यूच्या अफवेविषयी आधी स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र जागरुकता निर्माण करण्याची ही अजब पद्धत कोणालाच पटली नाही. आता स्वत: चा बचाव करत पूनमने नवी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये ती म्हणतेय, ‘मला मारून टाका, मला फासावर लटकवा पण तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवा.’ एका मार्केटिंग एजन्सीसोबत मिळून पूनम पांडेनं ही मोहीम चालवली आहे. या एजन्सीनेही लोकांची माफी मागितली आहे.

मार्केटिंग एजन्सीकडून माफीनामा

‘आमचं एकमात्र लक्ष्य होतं, ते म्हणजे सर्वाइकल कॅन्सरबद्दल जागरुकता वाढवणं. 2022 मध्ये भारतात 1,23,907 सर्वाइकल कॅन्सरचे केस आणि 77,348 मृत्यूंची नोंद झाली. ब्रेस्ट कॅन्सरनंतर सर्वाइकल कॅन्सर हा भारतातील मध्यम वयाच्या वर्गातील महिलांना प्रभावित करणारा दुसरा सर्वाधिक घातक आजार आहे. तुमच्यापैकी अनेकांना याविषयी माहिती नसेल. मात्र पूनमच्या आईने कॅन्सरशी झुंज दिली आहे’, असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सर्वाइकल कॅन्सर ट्रेंडमध्ये

पूनमच्या निधनाची अफवा पसरवल्यानंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाइकल कॅन्सर हा शब्द 1000 पेक्षा अधिक ट्रेंडिंगमध्ये आल्याचा दावाही एजन्सीने केला आहे. या अफवेमुळे ज्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांची आम्ही माफी मागतो, असंही त्यांनी म्हटलंय.

शुक्रवारी सकाळी पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिण्यात आली होती. या पोस्टमध्ये तिच्या मृत्यूचा उल्लेख करण्यात आला होता. सर्वाइकल कॅन्सरने पूनमचं गुरुवारी रात्री निधन झाल्याचं म्हटलं गेलं होतं. या पोस्टने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा घडवून आणली. अनेकांनी पूनमच्या निधनाबद्दल आणि सर्वाइकल कॅन्सरबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर पूनमचा व्हिडीओ समोर आला. “मी जिवंत आहे. माझं निधन सर्वाइकल कॅन्सरने झालेलं नाही. दुर्दैवाने मी त्या हजारो महिलांबद्दल हे बोलू शकत नाही, ज्यांनी सर्वाइकल कॅन्सरमुळे आपले प्राण गमावले आहेत. ते या आजाराविषयी काही करू शकत नाही, असा प्रश्न नाही. पण नेमकं काय करावं हेच त्यांना माहीत नाही,” असं ती म्हणाली.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.