‘गानाही गाओ, नोकरी क्यों करते हो’, साहेबांच्या टोमण्यांमुळे नोकरीच सोडली; वाचा, ‘या’ गायकाचा किस्सा!

'गानाही गाओ, नोकरी क्यों करते हो', साहेबांच्या टोमण्यांमुळे नोकरीच सोडली; वाचा, 'या' गायकाचा किस्सा!
prabhakar pokhrikar

अनेक गायकांचे किस्से आपल्याला माहीत आहेत. गाण्याच्या वेडापायी त्यांनी घेतलेले अजब निर्णय, त्यामुळे करावा लागणारा संघर्ष या गोष्टी आपण नेहमी ऐकत आलो आहोत. (prabhakar pokharikar left job for become singer, read story)

भीमराव गवळी

|

Mar 25, 2021 | 7:51 PM

मुंबई: अनेक गायकांचे किस्से आपल्याला माहीत आहेत. गाण्याच्या वेडापायी त्यांनी घेतलेले अजब निर्णय, त्यामुळे करावा लागणारा संघर्ष या गोष्टी आपण नेहमी ऐकत आलो आहोत. ‘जीवाला जीवाचं दान’ या गाण्याचे प्रसिद्ध गीतकार आणि गायक प्रभाकर पोखरीकर यांचाही एक किस्सा असाच आहे. त्यांनी आपल्या गाण्याच्या वेडापायी चक्क नोकरीलाच लाथ मारली. नेमकं काय घडलं होतं तेव्हा? वाचा. (prabhakar pokharikar left job for become singer, read story)

नेमकं काय घडलं?

प्रभाकर पोखरीकर यांचे वडील टेलर होते. त्यामुळे वडिलांचा हा वारसा पोखरीकरांकडे आला. पण त्यात ते रमले नाही. सुरुवातीला त्यांनी टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम केलं. त्यानंतर बीएमसी आणि एमटीएनएलमध्येही नोकरी केली. नोकरीमुळे त्यांना गाण्याच्या कार्यक्रमाला जाता येत नसायचं. त्यामुळे सारख्या दांड्या व्हायच्या. तर कधी कधी उशिरा कामावर यायचे. तर कधी कामावरून लवकर कार्यक्रमासाठी पळायचे. त्यामुळे कामातील सहकारी आणि साहेबांचे टोमणे सुरू झाले. एके दिवशी एमटीएनएलच्या साहेबांनी त्यांना थेट ‘गानाही गाओ, नोकरी क्यों करते हो, हमे आपका इंतजार करना पडता है’, असं सुनावलं. पोखरीकर यांना हा अपमान जिव्हारी लागला. साहेबांच्या प्रश्नांचा भडिमार संपताच, ‘कल से आपको मेरा इंतजार नही करना पडेगा’, असं ठणकावत पोखरीकरांनी राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाने घरचे मात्र घाबरून गेले होते. घरच्यांनी त्यांना नोकरीला जाण्याचा तगादा लावला होता. मात्र, पोखरीकरांच्या वडिलांनी त्यांना दोनदा शेकडो लोकांसमोर गाणं गाताना पाहिलं. पोखरीकर यांना लोक भरभरून पैसे देत असल्याचंही त्यांनी पाहिलं. त्यानंतर पोखरीकरांच्या वडिलांनी त्यांना कधीच नोकरीसाठी तगादा लावला नाही.

डॉक्टरांना थेट विचारलं, किती वर्षे जगेन?

प्रभाकर पोखरीकर हे अविवाहित आहेत. त्यामागे एक कारण आहे. त्यांच्या हृदयाच्या डाव्याबाजूची झडपं खराब झाली होती. त्यावर त्यांनी केईएममध्ये उपचारही घेतले होते. डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करायला सांगितलं. पण ऑपरेशनचा खर्च ज्यादा होता. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांनाच थेट विचारलं, ऑपरेशन न करता मी किती वर्षे जगेन. त्यावर काही वर्षेच तुम्ही जगू शकाल असं त्यांना सांगण्यात आलं. त्यावर माणसाचे जीवन क्षणभंगूर असते हे बुद्धाने अडीच हजार वर्षांपूर्वीच सांगितलंय, तुम्ही नवीन काय सांगता, अशी कोटी करत पोखरीकर यांनी बळेच विनोद करण्याचा प्रयत्न केला. पैशा अभावी त्यांनी ऑपरेशन करायचं टाळलं आणि लग्नही. एखाद्या मुलीशी लग्न करून तिला विधवा करून भिकेला लावण्यापेक्षा लग्न न केलेलं बरं, असं म्हणून त्यांनी लग्न करणं टाळलं. त्यानंतर त्यांनी गाणं आणि आंबेडकरी चळवळ या दोन गोष्टींमध्ये स्वत:ला वाहून घेतलं.

गायक ते कार्यकर्ता

पोखरीकर हे गायकच नसून कार्यकर्तेही आहेत. दलित पँथर चळवळीपासून त्यांनी गाण्याची प्रेरणा घेतली आहे. त्यांनी अनेक गायक आणि कार्यकर्तेही घडवले आहे. फुले-आंबेडकर आणि बुद्धाच्या विचाराने ते भारून गेलेले आहेत. त्यामुळेच त्यांनी पुण्यात धम्म यात्रा काढली होती. या यात्रेला पुणे जिल्ह्यात चांगला प्रतिसादही मिळाला होता. यात्रेच्या निमित्ताने ते गावागावात गेले होते. बौद्ध धर्माबाबत जागृती निर्माण करणारी ही यात्रा त्यांनी वर्षभर स्वखर्चाने चालवली. पुढे पैशाअभावी त्यांनी ती बंद करावी लागली होती. (prabhakar pokharikar left job for become singer, read story)

पोखरीकरांची गाजलेली गाणी

छाती ठोक हे सांगू जगाला
असा विद्ववान होणार नाही
कोणी झालाच विद्वान मोठा
बुद्ध भगवान होणार नाही…

आणि

जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने
माणसाला माणूसपण दिलं प्रेमाने

आणि

हे पाणी आणिले मी माठ भरूनी
हे घोटभर जाहो पिऊनी  (prabhakar pokharikar left job for become singer, read story)

संबंधित बातम्या:

सोनू निगमला कोणत्या मराठी गायकाने पहिला ब्रेक दिला माहीत आहे का?; वाचा, न ऐकलेला किस्सा

पहिलं गाणं रेकॉर्ड झालं अन् प्रल्हाद शिंदेंना सोन्याची अंगठी दिली; मधुकर घुसळेंचं ‘ते’ लोकप्रिय गाणं कोणतं?

गर्दीनं डोकं फिरलं अन् ‘डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया…’ सूचलं; वाचा अफलातून किस्सा!

(prabhakar pokharikar left job for become singer, read story)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें