Prabhu Deva | भाचीशी नव्हे, मुंबईतील फिजिओथेरपिस्टशी प्रभु देवाचे दुसरे लग्न!

Prabhu Deva | भाचीशी नव्हे, मुंबईतील फिजिओथेरपिस्टशी प्रभु देवाचे दुसरे लग्न!

अभिनेत्रीशी सूत जुळल्याने प्रभु देवाने पहिल्या पत्नीशी फारकत घेतली होती. त्यानंतरही त्याचे आयुष्य बरेच चर्चेत आले होते. मात्र, त्यानंतर त्याने लग्न केले नव्हते. आता त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या वृत्तामुळे प्रभु देवा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Harshada Bhirvandekar

|

Nov 20, 2020 | 7:17 PM

मुंबई : अभिनेता-नृत्यदिग्दर्शक प्रभु देवा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकताच तो पुन्हा एकदा लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. आता माध्यमांच्या रिपोर्टनुसार प्रभु देवाने पुन्हा लग्न केले आहे (Prabhu Deva Secretly Married). त्याने मुंबईतील फिजिओथेरपिस्टला आपली सहचारिणी म्हणून निवडले आहे. पहिली पत्नी रामलता आणि प्रभु देवाचा 2011मध्ये घटस्फोट झाला होता (Prabhu Deva Secretly married with Mumbai based Physiotherapist).

अभिनेत्रीशी सूत जुळल्याने प्रभु देवाने पहिल्या पत्नीशी फारकत घेतली होती. त्यानंतरही त्याचे आयुष्य बरेच चर्चेत आले होते. मात्र, त्यानंतर त्याने लग्न केले नव्हते. आता त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या वृत्तामुळे प्रभु देवा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दीड महिन्यांपूर्वी झाले प्रभु देवाचे लग्न…

एका वृत्तपत्राने प्रभु देवाच्या जवळच्या सूत्रांचा हवाला देत म्हटले की , ‘प्रभु देवा भाचीला डेट करत आहे ही वृत्त चुकीचे आहे. प्रभु देवाने फिजिओथेरपिस्टशी लग्न केले आहे आणि ती त्याची भाची नाही. ते दोघे सध्या चेन्नईमध्ये आहेत.’ प्रभु देवा या फिजिओथेरपिस्टला काही काळापूर्वी पाठीच्या दुखण्यावरील उपचारांसाठी भेटला होता. यादरम्यान दोघांचे प्रेम जुळले आणि नंतर त्या दोघांचे लग्न केले, असे म्हटले जात आहे.

भाचीला डेट करत असल्याचे वृत्त

अलीकडे प्रभुदेव आपल्या भाचीला डेट करत असल्याचे बोलले जात होते. ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे देखील म्हटले जात होते. तथापि, प्रभु देवा आणि त्यांच्या टीमकडून याबद्दल काहीही बोलले गेले नव्हते. मात्र, आता त्याच्या लग्नाच्या वृत्तानंतर या अफवांना पूर्ण विराम मिळाला आहे (Prabhu Deva Secretly married with Mumbai based Physiotherapist).

(Prabhu Deva Secretly married with Mumbai based Physiotherapist)

प्रेमसंबंधांमुळे मोडले वैवाहिक आयुष्य

दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री नयनताराशी असलेल्या प्रेमप्रकरणामुळे प्रभु देवाचे पहिले लग्न मोडले होते. 2009मध्ये प्रभु देवा आणि अभिनेत्री नयनतारा यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर सप्टेंबर 2010मध्ये प्रभुदेवाने स्वत: नयनतारा आणि त्याचे नाते जाहीर केले होते.

पत्नीने दिली धमकी

जेव्हा नृत्यदिग्दर्शक प्रभु देवाने नयनताराला डेट करण्यास सुरुवात केली होती तेव्हा, त्याचे लग्न झाले होते. इतकेच नव्हे तर, तो 3 मुलांचा ‘बाबा’देखील होता. प्रभु देवाच्या पत्नीला अर्थात रामलताला त्यांच्या प्रेमाची वार्ता कळताच त्यांनी 2010मध्ये कौटुंबिक न्यायालयात याचिका केली. या दरम्यान प्रभु देवा आणि नयनतारा लिव्ह-इनमध्ये राहत होते. त्यामुळे संतापलेल्या लतांनी प्रभु देवाला नयनतारासोबत लग्न केले तर मी उपोषणाला बसेन, अशी धमकी दिली होती. मात्र, नयनतारा आणि प्रभु देवा यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही.

(Prabhu Deva Secretly married with Mumbai based Physiotherapist)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें