प्रसिद्ध अभिनेत्रीला बॉयफ्रेंडसाठी परदेशात एकटं जाणं पडलं महागात; त्याचं खरं रुप समोर आल्यांतर तिची झाली अशी अवस्था
बॉयफ्रेंडला सपप्राईस देण्यासाठी परदेशात गेली पण तिलाच मिळाला मोठा धक्का; अनोळख्या देशात अभिनेत्रीची झाली अशी अवस्था...

मुंबई | प्रेमाचं नातं फक्त एका गोष्टीवर आधारलेलं असतं आणि ती गोष्ट म्हणजे विश्वास – आदर… जर नात्यामध्ये विश्वास आणि आदर असेल तर कितीही संकटं आली तरी देखील नात्याला तडा जात नाही. पण प्रत्येक नात्यात आदर आणि विश्वास असतो असं नाही… आता देखील अशा एका अभिनेत्रीच्या लव्हस्टोरीबद्दल चर्चा रंगत आहे. जिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, छोट्या पडद्यावर देखील मोठी कामगिरी केली. पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्रीला अनेक चढ-उतारांचा समाना करावा लागला. बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री फक्त प्रेमासाठी परदेशात बॉयफ्रेंडला सरप्राईझ देण्यासाठी गेली. पण परदेशात गेल्यानंतर अभिनेत्रीला मोठा धक्का बसला.. परदेशात गेल्यानंतर आलेला अनुभव खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखातीच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लव्हस्टोरीची चर्चा रंगत आहे.
एका मुलाखतीत अभिनेत्रीने घडलेला धक्कादायक प्रकार चाहत्यांसोबत शेअर केला. अभिनेत्री म्हणाली, ज्या मुलासाठी परदेशात फक्त त्याला सरप्राईज देण्यासाठी गेली होती, तेव्हा तिला कळालं की ती ज्या मुलावर सर्वात जास्त प्रेम करत आहे… तो अभिनेत्रीसोबत खोटं बोलत आहे.. असा प्रसंग अभिनेत्री प्राची देसाई हिच्यावर ओढावला होता.
प्राची म्हणाली, ‘मी पहिल्यांदा कोणासाठी तरी एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास केला होता. जेव्हा मी त्याला विचारलं तेव्हा तो मुलगा त्याच देशात होता. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला भेटण्यासाठी गेली… तेव्हा तो तिकडे नव्हता… तेव्हा तो माझ्यासोबत खोटं बोलला होता. तेव्हा मी रडत न बसला एकटीने ट्रीपचा आनंद घेतला. स्वतःला वेळ दिला..’ असं अभिनेत्री म्हणाली…
एवढंच नाही तर, अभिनेत्रीला लग्नाबद्दल देखील विचारण्यात आलं. लग्नाच्या विषयावर प्राची म्हणाली, ‘मी ऑनस्क्रिन अनेकदा लग्न केलं आहे. त्यामुळे मला आता लग्नाचा कंटाळा आला आहे. माझे मित्र म्हणतात आई – वडील लग्नासाठी दबाव टाकत आहेत. पण मला माझ्या आई – वडिलांकडून कोणत्याच गोष्टीचं बंधन नाही.. मला वाटेल तेव्हा मी लग्न करेल…’
पुढे प्राची म्हणाली, ‘मी माझ्या अटी – शर्तींवर जगते. मला आत्मनिर्भर असणं प्रचंड आवडतं. यासाठी मी लग्नाचा विचार देखील बाजूला ठेवू शकते.. काही वर्षांनंतर लग्न करण्यास माझी हरकत नाही. पण जेव्हा मला माझ्या मनासारखा पार्टनर भेटेल तेव्हाच मी लग्न करेल…’ असं देखील प्राची म्हणाली.
प्राची देसाई हिच्या कामगिरीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘कसम से’ सिनेमातून अभिनयास सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, रॉक ऑन 2, अजहर आणि बोल बच्चन यांसारख्या सिनेमात देखील अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं.
