Video: मी आवतारामध्ये आले… फोटोग्राफरसमोर प्राजक्ता माळी असं का म्हणाली?
Video: सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री प्राजक्ता माळीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती मी आज आवतारामध्ये आली आहे असे बोलताना दिसत आहे. आता नेमकं काय झालं? जाणून घ्या...

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ओळखली जाते. तिने मालिका, चित्रपट, वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांची मने जिंकली आहेत. प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. प्राजक्ता अनेक कार्यक्रमांना देखील हजेरी लावताना दिसते. सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती फोटोग्राफर्सला मी आवतारामध्ये आली आहे असे बोलताना दिसत आहे. आता नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया…
नुकताच ‘बाप तुझ्यापायी’ ही वेब सीरिजचा प्रीमिअर सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये प्राजक्ता माळी देखील होती. एरवी साडी नेसून किंवा सुंदर ड्रेस घालून कार्यक्रमांना हजर राहणारी प्राजक्ता यावेळी विना मेकअप दिसली. तिने अगदू साधं शर्ट घातलं होतं आणि ती रेड कार्पेटवर आली. तेव्हा नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
View this post on Instagram
नेमकं काय झालं?
व्हिडीओमध्ये दिसत आहे की प्राजक्ता माळी ही पांढऱ्या रंगाचं सिंपल शर्ट घालून रेड कारपेटवर फोटोसाठी पोज देण्यासाठी उभी होती. तेव्हा ती हसत फोटोग्राफर्सला म्हणाली मी अवतारात आली आहे. तेथे उपस्थित असलेल्या मीडियाने तिच्या या लूकला देखील पसंती दर्शवली. प्राजक्ताचा हा साधा सिंपल लूक देखील चाहत्यांना आवडला आहे. तिच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताचा हा लूक सध्या चर्चेत आहे. काहींनी तिच्या साधेपणाचे कौतुक केले आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे.
प्राजक्ताच्या कामाविषयी
प्राजक्ता माळीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती शेवटचं फुलवंती सिनेमामध्ये दिसली होती. तिचा हा सिनेमा तुफान हिट ठरला होता. या चित्रपटात प्राजक्ता मुख्य भूमिकेत दिसली होती. तसेच या चित्रपटाची निर्मिती देखील प्राजक्ताने केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घातला होता. सध्या प्राजक्ता सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. आता चाहत्यांमध्ये प्राजक्ताच्या आगामी प्रोजेक्टविषयी आतुरता आहे.
