ही प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाच्या 7 वर्षे आधीच 34 मुलींची आई, श्रेयस अय्यरशी खास नाते
ही अभिनेत्री सध्या श्रेयस अय्यरसोबत असलेल्या खास नात्यामुळे चर्चेत आली आहे. आता तिचे नेमके नाते काय? चला जाणून घेऊया...

बॉलिवूडमधील अनेक जुन्या अभिनेत्रींनी आजही लोकांच्या मनात आपले स्थान कायम ठेवले आहे. जरी त्यांनी चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घेतला असला तरी त्या आपल्या चाहत्यांशी जोडलेल्या राहतात. अशाच एका अभिनेत्रीविषयी आम्ही बोलत आहोत. ही अभिनेत्री सध्या खूप चर्चेत आहे. आता ही अभिनेत्री कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसनू प्रीती झिंटा आहे. ती शेवटची 2018 मध्ये चित्रपटात दिसली होती. सध्या ती आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात तिच्या पंजाब किंग्स संघामुळे चर्चेत आहे.
प्रीती झिंटाने 1998 मध्ये शाहरुख खानच्या ‘दिल से’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिने छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘क्या कहना’ चित्रपटात दिसली. चित्रपटांमधून आपली ओळख निर्माण करताना तिने लोकांच्या मनातही खास स्थान मिळवले. 2016 मध्ये तिने आपल्या आयुष्याला नवीन वळण दिले आणि लग्न केले, पण लग्नाच्या सात वर्ष आधीच ती आई झाली.
वाचा: लेकीला वाजली थंडी, बापाने रात्रभर जाळले 14 कोटी; पैशात लोळणारा तो अब्जाधीश होता तरी कोण?
34 मुलींना दत्तक घेतले
खरंतर, जेव्हा प्रीती आपला 34 वा वाढदिवस साजरा करत होती, तेव्हा तिने तो दिवस आणखी खास बनवला. 2009 मध्ये ती 34 वर्षांची झाली, तेव्हा तिने 34 अनाथ मुलींना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सर्व मुली आहेत. त्यावेळी तिने याबद्दल बोलताना हा अनुभव अनोखा असल्याचे सांगितले होते. तसेच, ती या सर्व मुलींची पूर्ण काळजी घेईल आणि वर्षातून दोनदा त्यांना भेटण्यासाठी ऋषिकेशला येईल, असेही तिने म्हटले होते.
आयपीएल संघामुळे चर्चेत
प्रीतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर 2021 मध्ये तिने इंस्टाग्रामद्वारे लोकांना माहिती दिली होती की तिने सरोगेसीद्वारे जय आणि जिया या दोन मुलांचे स्वागत केले आहे. सध्या ती आयपीएल संघ पंजाब किंग्समुळे चर्चेत आहे. तिच्या संघाने इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. संघाबद्दल बोलायचे झाले, तर या संघाचा कर्णधार भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आहे.
