AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेकीला वाजली थंडी, बापाने रात्रभर जाळले 14 कोटी; पैशात लोळणारा तो अब्जाधीश होता तरी कोण?

या व्यक्तीने पैसे ठेवण्यासाठी गोदाम खरेदी केले होते. त्यामधील अर्धे पैसे तर उंदीर कुरतडत असत. आता ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण?

लेकीला वाजली थंडी, बापाने रात्रभर जाळले 14 कोटी; पैशात लोळणारा तो अब्जाधीश होता तरी कोण?
Father and daughterImage Credit source: AI Image
| Updated on: Jun 02, 2025 | 6:25 PM
Share

असे म्हणतात की वडिलांना आपल्या मुलींबद्दल विशेष प्रेम असते. एक बाप आपल्या मुलीच्या आनंदासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एक बाप आपल्या मुलीला थंडी वाजत असल्याने 14 कोटी रुपये जाळेल? होय, तुम्ही बरोबर वाचले, ही कोणती काल्पनिक कथा नाही, तर एक खरी घटना आहे. एका वडिलांनी 14 कोटी रुपये जाळले, केवळ यासाठी की त्याच्या मुलीला थंडी वाजत होती. या महान व्यक्तीचे नाव होते पाब्लो एस्कोबार. चला जाणून घेऊया सनकी व्यक्तीबद्दल…

पाब्लो एस्कोबार कोण होता?

जगातील गुन्हेगारी विश्वात अनेक नावे अशी आहेत जी त्यांच्या काळ्या कृत्यांमुळे इतिहासाच्या पानांवर नोंदली गेली. पण यापैकी जर कोणाचे नाव सर्वात वर घेतले जाते, तर ते आहे पाब्लो एस्कोबार. कोलंबियाचा हा व्यक्ती केवळ ड्रग माफिया नव्हता, तर गुन्हेगारीचा ‘किंग’ मानला जात होता. त्याची संपत्ती, प्रतिष्ठा आणि दहशतीच्या कथा जगभरात प्रसिद्ध होत्या.

वाचा: 3 मुलांच्या आईवर आला जीव, काकू म्हणून आवज देत गेला बेडरुममध्ये; नवऱ्याने नको त्या अवस्थेत पाहिलं अन्…

मुलीला थंडी वाजत होती, आणि मग…

पाब्लो केवळ गुन्ह्यांसाठीच नव्हे, तर पैसा उधळण्याच्या त्याच्या पद्धतींसाठीही ओळखला जात होता. एकदा त्याच्या मुलीला प्रचंड थंडी वाजत होती. आजूबाजूला बर्फाळ वारे वाहत होते आणि पाब्लोला त्याच्या मुलीची थरथरणारी अवस्था पाहवली नाही. त्याच्याकडे दोन मिलियन डॉलर (सुमारे 14 कोटी रुपये) रोख होते. त्याने एक क्षणही न दवडता त्या नोटांना आग लावली, जेणेकरून त्याच्या मुलीला थंडी वाजणार नाही.

उंदिरांनी खाल्ले अब्जावधी रुपये

पाब्लोच्या कमाईचा अंदाज यावरून लावता येईल की त्याची रोजची कमाई 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. इतका पैसा होता की त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जागा कमी पडत होती. त्याने अनेक गोदामे बांधली, जिथे नोटांचे गठ्ठे पिशव्यांमध्ये भरून ठेवले जात होते. पण तिथेही सुरक्षितता नव्हती. दरवर्षी सुमारे 1 अब्ज रुपयांच्या नोटा उंदीर कुरतडून टाकायचे. असे ही म्हटले जाते की, पाब्लो आपल्या पैशांना रबर बँडने बांधण्यासाठी दर आठवड्याला 1000 डॉलर खर्च करायचा.

फोर्ब्सच्या यादीत गुन्हेगार

1989 मध्ये फोर्ब्स मासिकाने पाब्लो एस्कोबारला जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती घोषित केले होते. त्याची एकूण संपत्ती त्या वेळी 25 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होती. त्याच्या ड्रग व्यवसायाने जगातील 80% कोकेन व्यापारावर कब्जा केला होता. इतकेच नव्हे तर त्याने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि शत्रूंना नष्ट करण्यासाठी केवळ पोलिसांनाच नव्हे तर न्यायाधीश, नेते आणि पत्रकारांनाही विकत घेतले होते. त्याच्यामुळे सुमारे 15,000 लोकांचा मृत्यू झाला होता.

कसा झाला मृत्यू?

2 डिसेंबर 1993 रोजी एस्कोबारचा अंत झाला. कोलंबियन पोलिसांपासून पळत असताना छतावर गोळ्यांचा वर्षाव झाला आणि त्याचा मृत्यू झाला. काही लोकांचे म्हणणे आहे की त्याने स्वत:ला गोळी मारुन घेतली होती. त्याला अटक करण्यात कधीही पोलिसांना यश आले नाही.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.