भिंतीवर डोकं आपटून रडावंसं वाटतं..; IVF फेल झाल्यावर अशी होती प्रिती झिंटाची अवस्था

अभिनेत्री प्रिती झिंटा 2021 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून आई बनली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती आयुष्यातील कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. IVF सायकल्सदरम्यान कोणत्या गोष्टींचा सामना केला, याविषयी तिने सांगितलंय.

भिंतीवर डोकं आपटून रडावंसं वाटतं..; IVF फेल झाल्यावर अशी होती प्रिती झिंटाची अवस्था
Preity Zinta Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 10:32 AM

अभिनेत्री प्रिती झिंटा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आयव्हीएफ ट्रिटमेंटच्या वेळी तिला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं, त्यावेळी तिची मनस्थिती कशी होती, याबद्दल प्रितीने सांगितलंय. ‘वोग इंडिया’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रितीला तिच्या कमबॅकविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. ‘लाहोर 1947’ या चित्रपटातून प्रिती अभिनयक्षेत्रात पुनरागमन करतेय. पुन्हा चित्रपटात काम करण्याविषयी बोलताना प्रिती तिच्या खासगी आयुष्यातील संघर्षाबद्दलही व्यक्त झाली.

प्रिती म्हणाली, “करिअरवर लक्ष केंद्रीत करणं महत्त्वाचं आहे पण एक महिला म्हणून ही गोष्ट समजून घ्यावी लागते की आयुष्य प्रत्येकासाठी समान नसतं. कारण बायोलॉजिकल क्लॉक ही गोष्ट खरी आहे. लोक हे विसरतात की महिलांसाठी, अभिनेत्री म्हणून तुमचं करिअर महत्त्वाचं आहे, तुमच्याकडे काम असायला हवं. पण त्याचसोबत कुटुंबही तितकंच महत्त्वाचं आहे. आता माझी मुलं दोन वर्षांची झाल्यानंतर मी पुन्हा काम करू शकते असं वाटतंय.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

“प्रत्येकाप्रमाणेच माझ्याही आयुष्यात काही चांगले आणि काही वाईट दिवस आले. खऱ्या आयुष्यात नेहमीच आनंदी राहणं खूप कठीण होऊन जातं. खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही कठीण काळाचा सामना करत असता. माझ्या आयव्हीएफ सायकल्सदरम्यान मला तसं वाटायचं. चेहऱ्यावर हास्य आणणं आणि प्रत्येकाळी चांगलं वागणं माझ्यासाठी कठीण होतं. कधीकधी तर मला माझं डोकं भिंतीवर आपटून रडावंसं वाटायचं. कोणाशीच बोलायची इच्छा नसायची. त्यामुळे प्रत्येक कलाकासाठी हे एक बॅलेन्सिंग अॅक्ट असतं”, असंही ती पुढे म्हणाली. प्रिती नोव्हेंबर 2021 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून आई बनली. प्रिती आणि जीन गुडइनफ यांचा जय आणि जिया अशी जुळी मुलं झाली. लग्नाच्या पाच वर्षांनंतर प्रितीने सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला. मुलांसोबतचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

प्रिती झिंटा लवकरच ‘लाहोर 1947’ या चित्रपटातून अभिनयात पुनरागमन करतेय. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी करत आहेत. यामध्ये प्रितीसोबतच शबाना आझमी आणि अली फजल यांच्याही भूमिका आहेत. त्याचसोबत सनी देओल आणि त्याचा मोठा मुलगा करण देओलसुद्धा या चित्रपटात झळकणार आहे.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.