Priya Marathe Death : मी देवालाही माफ करणार नाही..; प्रिया मराठेच्या निधनानंतर पतीची पोस्ट चर्चेत
अभिनेत्री प्रिया मराठेचं गेल्या महिन्यात कर्करोगाने निधन झालं. तिच्या आजारात, लढाईत प्रेमाने, खंबीरपणे साथ देणारा पती, अभिनेता शंतनू मोघे कुठेही व्यक्त झाला नव्हता. महिन्याभरानंतर त्याने एक मोठी पोस्ट लिहीती प्रियाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याची पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे.

मराठीसह हिंदी मालिकाही गाजवणारी, नाटकातही अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं गेल्या महिन्यात (31 ऑगस्च) निधन झालं. कर्करोगाशी सातत्याने दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली. तिच्या निधनाच्या महिनाभरानंतर तिचा पती, अभिनेता शंतनू मोघे याने पहिल्यांदाच जाहीररित्या भावना व्यक्त केल्या आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्याच्या अधिकृत अकाऊंटवरून शंतनूने प्रियाच्या आठवणीत एक मोठी, इमोशनल पोस्ट लिहीली आहे. यामध्ये तो प्रियाच्या आठवणींसोबतच, तिचा लढा, या काळात साथ देणारे कुटुंबिय, मित्र-मैत्रिणींबद्दल भरभरन व्यक्त झाला आहे. त्याची ही पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यांत अश्रू तरळतील.
गेल्या महिन्यात प्रियाच्या निधनाचं वृत्त समोर आल्यावर अनेकांना मोठा धक्का बसला. तिचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र-मैत्रिणी सोडता तिच्या आजाराबद्दल फारसं कोणालाही माहीत नव्हतं, त्यामुळे अनेकांसाठी ही बातमी खूपच क्लेशदायक आणि तितकीच हादरवणारी होती. तिच्या निधनानंतर तिच्यासोबत काम केलेले सहकलाकार, मित्र-मैत्रिणी, चाहते अनेकांनी भावना व्यक्त करत तिला श्रद्धांजली वाहिली. अनेकांनी तिच्यासोबतचे काही फोटो पोस्ट करत आठवणी, तिचं काम, प्रेमळपणा, कर्तत्व याबद्दलही लिहीलं. मात्र या सगळ्यात प्रियाचा पती, अभिनेता शंतनू मोघे कुठेच व्यक्त झाला नव्हता. तिच्या जाण्यानंतर काही दिवसांनी तो त्याच्या कामावर पुन्हा रुजू झाला आणि मालिकेचे शूटिंगही त्याने सुरू केले होते.
शंतनू मोघेची पोस्ट
मात्र आज ( 1 ऑक्टोबर) प्रियाला जाऊन एक महीना झाला असून , शंतनूने सोशल मीडिया अकाऊंटवर एक खास पोस्ट लिहीत प्रियासोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. त्यासोबत त्याने एक मोठी कॅप्शन लिहीत भावनांना वाट मोकळी करून दिली. ” ही कृतज्ञतेची, खूप खास पोस्ट आहे. व्हॉट्सॲप, मेल, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या विविध प्लॅटफॉर्मवरुन प्रियाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या, त्या सर्वांचे मला आभार मानयचे आहेत. मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय आणि सगळ्या चाहत्यांचा मी खूप आभारी आहे.” असं शंतनूने लिहीलं आहे.
आज एक महीना झाला…
“(प्रिया जाऊन) एक महीना झाला, पण तिच्या जाण्यामुळे झालेली वैयक्तिक हानी आणि ते दु:ख शब्दांत मांडता येण्यासारखं नाही”, असं शंतनूने पुढे लिहीलं. ” तिचं जाणं खूप अनपेक्षित, त्रासदायक, अयोग्य आणि दु:खद होतं. तिच्या निधनामुळे सर्वांनाच खूप दु:ख झालं, हृदयाला वेदना झाल्या, ती जखम भळभळती आहे. पण प्रियाने तिच्या प्रेमळ, समजुतदार स्वभावाने अनेकांची मनं जिंकली. या सगळ्या काळात आमच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहणाऱ्यांना, सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद ” असं त्याने पुढे नमूद केलं.
View this post on Instagram
चुकलास तर माफी नाही.. थेट देवालाच इशारा
त्यानंतर पोस्टमध्ये शंतनूने देवाला उद्देशून लिहीलं आहे. ” “देवा तिची काळजी घे, तिच्यावर खूप प्रेम कर आणि जर कोणतीही चूक झाली तर तुला माफ करणार नाही.” अशा शब्दांत शंतनूने देवालाच इशारा दिला आहे. My ANGEL❤️…. Till we meet again असं लिहीत त्याने प्रियाला अलविदा म्हटलं आहे.
Priya Marathe : प्रिया मराठेला जाऊन 20 दिवस झाले, शंतनू मोघे पहिल्यांदाच बोलला…
शंतनूची ही पोस्ट खूप चर्चेत असून त्यावर अनेकांनी लाईक देत प्रियाबद्दल कमेंट्स केल्या असून शंतनूला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
