AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Copyright Case | मुंबई पोलिसांची CIU जोडणार अमिताभ बच्चन यांच्या ‘जंजीर’ची कडी, मास्टरमाईंड कोण, लवकरच शोधणार!

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा सर्वात प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक असलेला जंजीर (Zanjeer) या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे.

Copyright Case | मुंबई पोलिसांची CIU जोडणार अमिताभ बच्चन यांच्या 'जंजीर'ची कडी, मास्टरमाईंड कोण, लवकरच शोधणार!
| Updated on: Jan 13, 2021 | 6:24 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा सर्वात प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक असलेला जंजीर (Zanjeer) या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. हे प्रकरण कॉपीराइटचे आहे ज्यामध्ये आता मुंबई पोलिसांना जंजीरच्या कॉपीराइटची बनावट कागदपत्रे कोणी तयार केली याचा शोध घ्यावा लागणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी 12 मार्चला बॉक्स सिनेमा नावाच्या वाहिनीवर बेकायदेशीरपणे प्रसारित झाला होता. यानंतर प्रकाश मेहरा यांचा मुलगा पुनीत मेहराने मुंबई पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. (Puneet Mehra has lodged a case with the Mumbai Police)

या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार सीआययूने काल मुंबईतील मालाड भागात चिंचोलीबंदर येथे छापा टाकला आणि त्याचा सर्व्हर ताब्यात घेतला. या प्रकरणात पोलिसांना आता जंजीर या चित्रपटाचे बनावट कागदपत्रे देऊन कोणी विकले हे शोधून काढावे लागणार आहे, कारण या प्रकरणात पोलिसांना प्रकाश मेहराच्या बनावट सहीसह काही कागदपत्र सापडले होते, ज्यात या चित्रपटाचे हक्क विकण्याचा करार आहे. हे कागदपत्रे 1998 पासून बाजारात फिरत आहेत. 2009 मध्ये प्रकाश मेहरा यांचे निधन झाले.

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही कविता, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडियावर एक कविता शेअर केली होती. मात्र, त्या कवितेमुळे अमिताभ बच्चन अडचणीत सापडले आहेत. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून चहावर एक कविता शेअर केली मात्र, टिशा अग्रवाल नावाच्या एका महिलेचा असा दावा आहे की, अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली कविता तिने लिहिलेली आहे.

संबंधित बातम्या : 

Sonu Sood Vs BMC | सोनू सूदला मोठा दिलासा, कोर्टाकडून निकाल राखीव

Caught | जाहिरातीच्या शूटिंगसाठी रणबीर-कतरिना एकत्र, दोघांना सोबत बघून चाहत्यांना अत्यानंद!

(Puneet Mehra has lodged a case with the Mumbai Police)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.