AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजी परत येणार; अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री साकारणार भूमिका

ज्योती चांदेकर पंडित यांच्या निधनानंतर 'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नाचं उत्तर आता प्रेक्षकांना मिळालं आहे. मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री ही भूमिका साकारणार आहे.

'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजी परत येणार; अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री साकारणार भूमिका
Purna Aaji in Tharla Tar MagImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 19, 2025 | 7:44 AM
Share

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. काही दिवसांपूर्वीच पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. ‘ठरलं तर मग’च्या टीमलाही ज्योती ताई आपल्यातून निघून गेल्याचं दु:ख पचवणं आजही अवघड जातंय. पण शो मस्ट गो ऑन… गेले कित्येक दिवस पूर्णा आजी या पात्राला प्रेक्षक मिस करत होते. प्रेक्षकांच्या इच्छेखातर पूर्णा आजी पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहेत.

पूर्णा आजी म्हणजेची रोहिणी ताई म्हणाल्या, “ठरलं तर मग ही मालिका माझी आवडती मालिका आहे आणि मी न चुकता पाहते. याच मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहे. मनात संमिश्र भावना आहेत. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी साकारलेली भूमिका पुढे नेणार आहे. पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्यासोबत माझी जुनी मैत्री होती. कधी वाटलं नव्हतं ती अशी अचानक सोडून जाईल आणि तिची भूमिका मी साकारेन. कलाकाराने ती भूमिका एका पातळीवर नेऊन ठेवलेली असते. त्या कलाकाराने केलेलं काम पुढे न्यायचं थोडं जबाबदारीचं काम आहे. माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे. प्रेक्षकांनी तितक्याच दिलदारपणे स्वीकारावं ही इच्छा आहे.”

पूर्णा आजीच्या एण्ट्रीने मालिकेच्या सेटवरही आनंदाचं वातावरण आहे. सगळ्या टीमने मिळून रोहिणी ताईंचं मनापासून स्वागत केलं आहे. सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली, “पूर्णा आजीच्या रुपात रोहिणी ताईंना पाहून खूप भरुन आलं. रोहिणी ताईंसोबत काम करताना खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. त्यांच्या रुपात विद्यापीठच आमच्या सेटवर आलंय. रोहिणी ताई म्हणजेच पूर्णा आजीसोबत आता मालिकेची गोष्ट पुढे नेताना आनंद होतोय.” ‘ठरलं तर मग’ ही मालिरा रात्री 8.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

याआधी ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनीही पूर्णा आजीच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया दिली होती. मालिकेतील त्यांच्या भूमिकेबद्दल कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. नुकतेच या मालिकेने 900 भाग पूर्ण केले होते. त्यावेळी संपूर्ण टीमने सेटवर पूर्ण आजीच्या नावाने सदाफुलीचं रोपटं लावलं होतं. त्याचा फोटो जुईने चाहत्यांसोबत शेअर केला होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...