AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rashmika Madanna : अवघ्या 21 व्या वर्षी साखरपुडा, रश्मिका मंदानाच्या माजी प्रियकराला तुम्ही ओळखता का ?

चित्रपट प्रदर्शित होवो किंवा न होवो, रश्मिका ही नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही लाईमलाइटमध्ये आहे. रश्मिका आणि साऊथचा गाजलेला अभिवेता विजय देवरकोंडा हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा गेल्या बऱ्याच काळापासून सुरू आहे.

Rashmika Madanna : अवघ्या 21 व्या वर्षी साखरपुडा, रश्मिका मंदानाच्या माजी प्रियकराला तुम्ही ओळखता का ?
रश्मिका मंदानाImage Credit source: social media
| Updated on: Dec 17, 2024 | 9:31 AM
Share

‘पुष्पा 2 ‘ या चित्रपटामुळे सध्या अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना दोघेही भलतेच चर्चेत आहेत. दोघांच्याही प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने आठवड्याभरातच चांगला गल्ला कमावला असून बॉक्स ऑफीसवर तो बराच गाजत आहे. एकंदरच हे वर्ष रश्मिका मंदाना हिच्यासाठी उत्तम ठरलं आहे. चित्रपट प्रदर्शित होवो किंवा न होवो, रश्मिका ही नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही लाईमलाइटमध्ये आहे. रश्मिका आणि साऊथचा गाजलेला अभिवेता विजय देवरकोंडा हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा गेल्या बऱ्याच काळापासून सुरू आहे. दोघांनीही अधिकृतपणे आपल्या नात्याची कबुली दिली नसली तरी बरेच वेळा ते एक्तर स्पॉच होतात. काही दिवसांपूर्वीच ते दोघे एका कॉफी डेटवर गेल्याचे त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून समोर आलं होतं. विजयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जे फोटो शेअर केले होते, त्याच लोकेशनवरचे रश्मिकाचेही फोटो समोर आले होते.

एवढंच नव्हे तर काही दिवसांपूर्वी रश्मिका ही चित्रपट पाहण्यास गेली होती, त्यावेळी तिच्यासोबत विजयचे कुटुंबियही होते अशी चर्चा होती. एकंदरच दोघेही त्यांच्या नात्याबाबात गंभीर असून लवकरच लग्नबंदनात अडकणार असल्याची चर्चाही सुरू आहे. पण रश्मिकाचं यापूर्वीही लग्न ठरलं होतं, विजय आधी तिच्या आयुष्यात दुसर व्यक्ती होती, एवढंच नव्हे तर त्यांचा साखरपुडाही झाला होता. तिचा पहिला प्रियकर कोण होता, तुम्हाला माहीत आहे का ?

पुष्पा 2 मधील ही अभिनेत्री वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं काही बोलत नाही पण याआधीचही तिचा साखरपुडा झाला होता, सगळं काही ठीक होतं, पण अचानक ते नातं मोडलं. असं नेमकं काय झालं ?

कोणाशी झाला होता रश्मिकाचा साखरपुडा ?

सध्या रश्मिकाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तोही तिच्या साखपुड्याचा. ही तब्बल 8 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 2017 च्या आसपास रश्मिका मंदाना हिने अभिनेता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता. तेव्हा रश्मिका ही केवळ 21 वर्षांची होती अशी माहिती समोर आली आहे. तर रक्षित हा 34 वर्षांचा होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टी याच्या ‘किरिक पार्टी’ चित्रपटात रश्मिका मंदाना आणि रक्षित या दोघांना कास्ट करण्यात आलं होतं. 30 डिसेंबर 2016 साली रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर अनेक रेकॉर्ड्स मोडले. रिपोर्टसनुसार, 4 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर 50 कोटींच्या गल्ला कमावला होता. इंटस्ट्रीत पाऊल टाकताच रश्मिकाने मोठा धमाका केला. याच चित्रपटादरम्यान रश्मिका आणि रक्षित या दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली.

रश्मिका मंदान्ना आणि रक्षित शेट्टी यांनी 2018 मध्ये मोडला साखरपुडा

रश्मिका मंदान्नाने ‘किरिक पार्टी’मधून डेब्यू केलं. त्यानंतर काही दिवसांनी दोघआंनी एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांचा साखरपुडा झाला. पण, काळाच्या ओघात त्यांच्या नात्यात निर्माण झालेली दरी इतकी रुंदावत गेली की 2018 साली दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेत साखपुडा मोडाल. मात्र वेगळे होण्याच्या निर्णयामागचे कारण दोघांनी कधीच उघड केलं नाही.

लग्न मोडल्यानंतर रश्मिकाने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले. आज ती साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही सक्रिय आहे. विजय देवराकोंडासोबतच्या तिच्या नात्याचीही सध्या बरीच चर्चा सुरू असते.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.