AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालेगाव महापालिकेत नमाज पठण? थेट व्हिडीओ शेअर करून किरीट सोमय्यांची मोठी मागणी!

मालेगाव महानगरपालिकेत नमाज अदा केल्याचा दावा केला जातोय. तसा व्हिडीओ किरीट सोमय्या यांनी त्यांच्या एक्स खात्यावर अपलोड केला आहे. या प्रकरणी कारवाई केली जाण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मालेगाव महापालिकेत नमाज पठण? थेट व्हिडीओ शेअर करून किरीट सोमय्यांची मोठी मागणी!
kirit somaiya and malegaon municipal corporationImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 25, 2026 | 6:14 PM
Share

Malegaon Namaz Video : गेल्या काही दिवसांपासून मालेगाव महानगरपालिकेचे कार्यालय वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहे. काही दिवसांपूर्वी याच महापालिका कार्यालयात उपमहापौर शान ए हिंद यांनी त्यांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावला होता. हा फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चांगलाच वाद पेटला. नंतर हा फोटो उपमहापौर यांच्या दालनातून हटवण्यात आला. या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली होती. आता असे असतानाच या महापालिकेच्या एका कार्यालयात थेट नमाज पठण केल्याचा दावा केला जातोय. तसा एक व्हिडीओ समोर आला आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या समाजमाध्यम खात्यावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या कथित घटनेविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

नेमका दावा काय?

किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर केलेल्या दाव्यानुसार काही शासकीय कर्मचाऱ्यांनी मालेगाव महानगरपालिका कार्यालयात नमाज पठण केले आहे. विशेष म्हणजे तेथील अधिकाऱ्यांनीदेखील याची पुष्टी केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. यासह त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. संबंधित लोकांविरोधात गुन्हा दाखल करावा तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आतापर्यंत नेमकी काय माहिती समोर आली?

दरम्यान, हा कथित व्हिडीओ मालेगाव मनपाच्या विद्युत विभागाच्या कार्यालयातील असल्याचे बोलले जात आहे. मालेगाव शहरातील विद्युत विभागाच्या कार्यालयात वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठा संदर्भात तक्रार करण्यात आली होती. परंतु वारंवार तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ नमाज पठण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीस नेमका कोणता निर्णय घेणार?

दरम्यान, आता किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा लावून धरल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमका कोणता निर्णय घेणार का? सोमय्या यांच्या मागणीनुसार तेथील संंबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे निलंबन होणार का? मालेगाव महापालिकेचे प्रशासन सोमय्या यांच्या दाव्यावर नेमका काय निर्णय देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?