‘पुष्पा 2’ दिग्दर्शकासाठी अल्लू अर्जून आहे खूपच लकी, 20 वर्षांत दिलेत 3 सुपरहिट चित्रपट
Pushpa 2 : दाक्षिणात्य दिग्दर्शक सुकुमार सध्या अभिनेता अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा 2: द रूल' हा चौथा चित्रपट घेऊन येत आहे. या दोन्ही दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेत्याच्या जोडीने यापूर्वी 3 वेळा एकत्र काम केले आहे.

Pushpa 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा 2’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच दिवसांपासून अल्लू अर्जुनचे चाहते या चित्रपटाची मनापासून वाट पाहत होते. आता ती प्रतीक्षा संपली आहे. ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक सुकुमार यांनी केले आहे. सुकुमार यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या चित्रपटांनी नेहमीच धुमाकूळ घातला आहे.
दाक्षिणात्य दिग्दर्शक सुकुमार यांचा प्रत्येक चित्रपट लोकांच्या हृदयात आपलं खास स्थान निर्माण करतो. सुकुमार यांनी यापूर्वी अल्लू अर्जुनसोबत 3 चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि प्रत्येक वेळी अल्लू अर्जन सुकुमार यांच्यासाठी भाग्यवान किंवा खासच ठरला आहे.
आर्या
2004 मध्ये पहिल्यांदा अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार यांनी आर्या चित्रपटात एकत्र काम केले होते. रिलीजसह आर्याने बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला. या चित्रपटातील अल्लू अर्जुनचे काम सर्वांनाच खूप आवडले होते. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्याचबरोबर सुकुमार यांच्या दिग्दर्शनाचंही सर्वांनी कौतुक केलं. 4 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने जवळपास 30 कोटींचा बिझनेस केला होता.
आर्या 2
5 वर्षांनंतर अल्लू अर्जुन आणि सुकुमार पुन्हा एकदा एकत्र आले. या दोघांनी 2004 मध्ये आर्या या चित्रपटाचा दुसरा भाग बनवला होता. आर्या 2 मध्ये पुन्हा एकदा या अभिनेता-दिग्दर्शक जोडीने धमाल उडवली. आर्या 2 हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनचे ही खूप कौतुक झाले होते.
पुष्पा: द राइज
आर्या 2 नंतर तिसऱ्यांदा एकत्र काम करण्यासाठी अल्लू अर्जुन आणि सुकुमार यांना 12 वर्षे लागली. पण 12 वर्षांनंतर जेव्हा हे दोघे एकत्र आले तेव्हा त्यांनी बॉक्स ऑफिसवर पुन्हा धुमाकूळ घातला. अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार डिसेंबर 2021 मध्ये ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाद्वारे एकत्र परतले. ‘पुष्पा: द राइज’ने बॉक्स ऑफिसवर 395 कोटींची कमाई करत खळबळ उडवून दिली होती.
पुष्पा 2: द रूल
आता चौथ्यांदा अल्लू अर्जुन आणि सुकुमार ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटाद्वारे चित्रपटगृहात एकत्र आले आहेत. हा चित्रपट विक्रमी कमाई करेल, अशी ही अपेक्षा आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही पूर्ण पाठिंबा मिळत आहे. चित्रपटाच्या कमाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
