हैदराबाद: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर प्रेक्षकांना सीक्वेलची उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. गेल्या प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात आपली छाप सोडली. पुष्पाचे डायलॉग्स, गाणी सर्वत्र चर्चेत राहिले. सोशल मीडियावर त्यावरून मीम्स आणि रिल्स व्हायरल होऊ लागले. पुष्पा 2 मध्ये डबल धमाका करण्यासाठी निर्माते एका लोकप्रिय अभिनेत्याला ऑफर देत असल्याचं कळतंय.