AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivrayancha Chhava : जिझिया कर लावत जनतेला वेठीस धरणाऱ्या काकर खानच्या भूमिकेत ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, भूषण पाटील, रवी काळे, समीर धर्मधिकारी, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण शिवतरे,अमित देशमुख, तृप्ती तोरडमल, ईशा केसकर, प्रसन्न केतकर अशी कलाकारांची मोठी फौज ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात आहेत.

Shivrayancha Chhava : जिझिया कर लावत जनतेला वेठीस धरणाऱ्या काकर खानच्या भूमिकेत 'हा' प्रसिद्ध अभिनेता
काकर खानच्या भूमिकेत 'हा' प्रसिद्ध अभिनेताImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 12, 2024 | 3:20 PM
Share

मुंबई : 12 फेब्रुवारी 2024 | अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये खलनायक म्हणून झळकलेला अभिनेता राहुल देव आता आगामी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात ‘काकर खान’ ही खलनायकी व्यक्त्तिरेखा साकारणार आहे. ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिकपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या 16 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. औरंगजेबाने बुऱ्हाणपूरची पूर्ण जबाबदारी काकर खान या अनुभवी सरदारावर सोपविली होती. लोकांवर जिझिया कर लावत काकर खानने जनतेस वेठीस धरलं होतं. काकरखानच्या अन्यायी राजवटीपासून छत्रपती संभाजी महाराजांनी रयतेची सुटका केली होती.

आपल्या या भूमिकेविषयी बोलताना राहुल देव म्हणाले, “आजवरच्या अभिनय कारकिर्दीत अनेक खलनायकी भूमिका साकारल्या असल्या तरी क्रूरकर्मा ‘काकर खान’ ही ऐतिहासिक भूमिका करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. एखादी विशेष भूमिका वठवताना अगदी भाषेपासून चालण्या बोलण्याच्या सवयीपर्यंतचे बदल करावे लागतात. काकरखान खानची भूमिका असल्याने उर्दू भाषा आत्मसात करणं मला गरजेचं होतं. प्रत्येक भाषेचा स्वत:चा असा लहेजा असतो, तो लहेजा लक्षात घेत ही भाषा मी शिकून घेतली. भाषेनंतर प्रश्न होता तो लूक्सचा. त्यामुळे देहबोलीही तितकीच बोलकी असण्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर होती. ती मी माझ्या अभिनयातून केली.”

नुकताच या चित्रपटाला ट्रेलर प्रदर्शित झाला. ढोल-ताशांचा गजर, अभिनेता भूषण पाटील यांची छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशात दमदार एण्ट्री, छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या गाण्याचे नेत्रदीपक सादरीकरण, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष, अशा उत्साहपूर्ण भारावलेल्या वातावरणात ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा रोमांचकारी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाची, शौर्याची, अजोड पराक्रमाची महती या साऱ्यांचा अनुभव देणारा हा चित्रपट नव्या पिढीला खूप काही शिकवणारा असेल, असा विश्वास दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केला.

मल्हार पिक्चर्स कं. चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. कार्यकारी निर्माता प्रखर मोदी आहेत. कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए.फिल्म्स सांभाळत आहे.

मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या...
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या....
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?.