Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घरात राहुल महाजन करणार पुन्हा एकदा एन्ट्री!

'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) च्या घरात राहुल महाजन (Rahul Mahajan) पुन्हा एकदा एन्ट्री मारणार आहे.

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घरात राहुल महाजन करणार पुन्हा एकदा एन्ट्री!

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या घरात राहुल महाजन (Rahul Mahajan) पुन्हा एकदा एन्ट्री मारणार आहे. परंतू यावेळी राहुल एक स्पर्धक म्हणून नव्हे तर केवळ एका आठवड्यासाठी फॅमिली मेंबर म्हणून घेणार आहे. राहुल बिग बॉसमध्ये अभिनव शुक्लाला सपोर्ट करण्यासाठी येणार आहे. मात्र, राहुलला बिग बॉसच्या घरामध्ये येण्याच्या अगोदर 14 दिवस क्वांटाइन राहवे लागणार आहे. अली गोनीला सपोर्ट करण्यासाठी जास्मीन भसीन येणार असून सध्या जास्मीन क्वांटाइनमध्ये आहे. जास्मीन भसीन बिग बॉसच्या घरातून बेघर झाल्यानंतर ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह झाली होती. (Rahul Mahajan will enter the house of Bigg Boss 14)

तिने रूबीनावर हल्लाबोल देखील केला होता. त्यानंतर रूबीनाच्या फॅन्सने जास्मीनला जोरदार ट्रोल केले होते. यामुळे आता हे बघण्यासारखे आहे की, जास्मीन एका आठवड्यासाठी बिग बॉसच्या घरात गेल्यावर आता काय-काय हंगामे होतात. बिग बॉस 14 च्या घरात नुकताच पत्रकार येऊन गेले त्यांनी बिग बॉसच्या घरातील सदस्यांना भरपूर प्रश्न विचारले. घरातील सदस्यांनी एक दुसऱ्यावर आरोप-प्रत्यारोप केले. मात्र, या सर्वांमध्ये नेहमीप्रमाणेच राखीने सर्वांना एंटरटेन केले.

बिग बॉसच्या घरातील सदस्यांना एक टास्क देण्यात आला होता. ज्यामध्ये घरातील सदस्य दोन टिममध्ये विभागले गेले होते. एका टिममध्ये निक्की तांबोळी, अर्शी खान, राहुल वैद्य, अली गोनी आणि सोनाली फोगट तर दुसऱ्या टिममध्ये अभिनव शुक्ला, रुबीना दिलैक, राखी सावंत, देवोलीना आणि विकास हे होते. मात्र, यावेळी निक्की टास्कमध्ये स्वत: च्या टिमला विजयी करण्यापेक्षा ती रूबीनाच्या टिमला मदत केली होती.

संबंधित बातम्या : 

जास्मीनपासून वेगळं होताना अली गोनीला हुंदका, चाहते म्हणाले, ओव्हरअ‌ॅक्टिंगचे 50 रुपये कापा

Bigg Boss 14 | बायकोसमोर अभिनवने राखीला नेसवली साडी, राखी म्हणते साडी घातली की समोसा बनवला!

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घराची नवी कॅप्टन बनणार राखी सावंत?

(Rahul Mahajan will enter the house of Bigg Boss 14)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI