AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं? राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी

या संपूर्ण प्रकरणामुळे आपली प्रतिमा मलिन झाली आहे. बरेच ब्रँड आणि कॉन्ट्रॅक्टही आपल्या हातातून गेले आहेत, अशी खंत शिल्पाने चौकशी दरम्यान गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्याचीही माहिती मिळतेय.

Raj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं? राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी
उद्योगपती राज कुंद्रा, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 9:54 PM
Share

मुंबई : अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेले आरोपी राज कुंद्रा यांची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात आली आहे. गुन्हे शाखेकडून शुक्रवारी शिल्पा शेट्टीची तिच्या जुहूमधील बंगल्यात चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान शिल्पाला 3 ते 4 वेळा रडू कोसळल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे. राज कुंद्रा यांनी अशा अश्लील चित्रपटांची निर्मिती केली आहे का? असा प्रश्न यावेळी गुन्हे शाखेनं शिल्पाला विचारल्याचंही कळतंय. महत्वाची बाब म्हणजे गुन्हे शाखेनं काही काळ राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची एकसोबत चौकशी केल्याचंही समजतंय. (Sources said that Shilpa Shetty burst into tears during the interrogation)

या संपूर्ण प्रकरणामुळे आपली प्रतिमा मलिन झाली आहे. बरेच ब्रँड आणि कॉन्ट्रॅक्टही आपल्या हातातून गेले आहेत, अशी खंत शिल्पाने चौकशी दरम्यान गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्याचीही माहिती मिळतेय. या दरम्यान गुन्हे शाखेनं व्हियान इंडस्ट्रिजमधील भाग भांडवलाबाबत राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची एकसोबत आमोरासमोर 2 ते 3 वेळा चौकशी केल्याचीही माहिती मिळत आहे.

शिल्पा म्हणते पॉर्न नाही इरॉटीक फिल्म्स बनवतो नवरा!

राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात गेल्या तीन दिवसांत बरेच खुलासे झाले आहेत. सोमवारी रात्री रिपु सुदन कुंद्रा म्हणजेच राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. शुक्रवारी त्याला 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर, राजकुंद्राच्या व्हॉट्सअॅप चॅटपासून त्याच्याविरूद्ध मॉडेल्स आणि अभिनेत्रींच्या निवेदनापर्यंत, त्याच्या ऑफिस सर्व्हरपासून ते बँक खात्यात पैशांच्या व्यवहारापर्यंत ते पॉर्न फिल्म व्हिडिओबद्दल पोलिसांनी अनेक दावे केले आहेत.

राज कुंद्रा यांच्याविरोध अश्लील चित्रपट बनवणे, लंडन ते दिल्ली विकणे आणि स्ट्रीमिंग अ‍ॅप्सवर वेबसाईट्सवर अपलोड करणे याचे पुष्कळ पुरावा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु या दरम्यान, राज कुंद्राच्या वकिलांपासून ते गेहाना वसिष्ठ आणि पूनम पांडे यांनी राज कुंद्राने बनवलेले चित्रपट अश्लील चित्रपट नाही तर, कामुक चित्रपट (इरॉटीक) असल्याचे सांगून त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीत या दोघांमध्ये काय फरक आहे, यावरून अनेकांचा गोंधळ उडालेला आहे.

कामुक चित्रपट (इरॉटीक) म्हणजे काय?

कामुक चित्रपट म्हणजेच लैंगिक उत्तेजना वाढवणारी सामग्री. अशा चित्रपटांना किंवा अशा सामग्रीस इरॉटीक असेही म्हटले जाते. जर आपल्याला सोप्या शब्दात समजवायचे झाले तर अशी कोणतीही सामग्री लैंगिक उत्तेजना वाढवते. हे एक चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण, नाटक, चित्रपट किंवा संगीत किंवा साहित्य काहीही असू शकते. याद्वारे प्रेक्षक, वाचकांची लैंगिक उत्तेजना वाढवता येते. यात नग्नतेचा समावेश आहे. परंतु यात लैंगिक संबंध नाही. हे केवळ सामग्रीतून उत्तेजन पातळी वाढवण्याचे काम आहे.

संबंधित बातम्या :

Raj Kundra Case | गुन्हे शाखेच्या प्रश्नांची उत्तरे देताना शिल्पा शेट्टी अस्वस्थ, ‘हॉटशॉट’बद्दल बोलताना म्हणाली ‘ते व्हिडीओ अश्लील नव्हते’

Shamita Shetty: हे ही दिवस जातील… कठीण काळात शमिता शेट्टीचा शिल्पाला भक्कम आधार

Sources said that Shilpa Shetty burst into tears during the interrogation

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.