राज कुंद्राच्या सर्व कामांची माहिती आहे का? Shilpa Shetty ला पोलिसांनी विचारले 10 महत्त्वाचे प्रश्न

राज कुंद्राला घेऊन क्राईम ब्रांचची टीमशुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या घरी गेली होती. शिल्पाचा जबाब आणि धाडसत्र संपल्यानंतर सहा तासांनी पोलिसांचे पथक राज कुंद्रासह घराबाहेर पडले.

राज कुंद्राच्या सर्व कामांची माहिती आहे का? Shilpa Shetty ला पोलिसांनी विचारले 10 महत्त्वाचे प्रश्न
Shilpa Shetty
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 11:05 AM

मुंबई : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) राहत्या घरी पोलीस चौकशी करण्यात आली. शिल्पाच्या जुहूमधील आलिशान घरात क्राईम ब्रांचने शुक्रवारी संध्याकाळी छापा टाकला होता. अटकेत असलेला उद्योजक आणि शिल्पाचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात तिचाही सहभाग आहे का, याची चौकशी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आली. यावेळी शिल्पा शेट्टीला जवळपास 10 महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

राज कुंद्राला घेऊन क्राईम ब्रांचची टीमशुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या घरी गेली होती. शिल्पाचा जबाब आणि धाडसत्र संपल्यानंतर सहा तासांनी पोलिसांचे पथक राज कुंद्रासह घराबाहेर पडले.

शिल्पा शेट्टीला कोणते 10 महत्त्वाचे प्रश्न विचारले?

1. तुमच्याकडे चांगले शेअर्स होते, तेव्हा 2020 मध्ये तुम्ही विआन कंपनी का सोडली?

2. विआन आणि कॅमरिन कंपनी यांच्यातील पैशांच्या व्यवहाराबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

3. लंडनमध्ये अश्लील व्हिडीओ पाठवण्यासाठी किंवा अपलोड करण्यासाठी विआनच्या ऑफिसचा वापर बर्‍याच वेळा केला गेला आहे, त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

4. हॉटशॉट ( HOTSHOT) कोण चालवते हे आपणास माहित आहे का?

5. हॉटशॉटच्या व्हिडीओ सामग्रीबद्दल आपल्याला काय माहिती आहे?

6. तुम्ही कधी हॉटशॉटच्या कामात सहभाग घेतला आहे का?

7. हॉटशॉटबद्दल प्रदीप बक्षी (राज कुंद्राचा मेहुणा) यांच्याशी कधी संवाद झाला आहे का?

8. अटक केलेल्या आरोपीच्या मोबाईलवरील काही चॅट्स आणि मेसेजबद्दल प्रश्न

9. आपल्याकडे राज कुंद्राच्या सर्व कामांची माहिती आहे का? (तो काय काम करतो, त्याचा व्यवसाय क़ाय आहे )

10. राज कुंद्राच्या आर्थिक व्यवहाराबद्दल काय माहिती आहे?

राज कुंद्राच्या घरावर छापा

गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्यांना त्याच्या घरात सर्व्हर आणि 90 व्हिडीओ सापडले, जे ‘हॉटशॉट’साठी बनवले गेले होते. राजला याबाबत विचारले असता, ते इतर ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच बोल्ड कंटेंट तयार करतात, परंतु हे सर्व ‘प्रौढ’ व्हिडीओंसाठी केले गेले नाही, असा दावा त्याने केला.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला 19 जुलै रोजी अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले

संबंधित बातम्या :

Raj Kundra Case | आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा, राज कुंद्राची मुंबई हायकोर्टात धाव

अश्लील चित्रपट प्रकरणात Shilpa Shetty चा सहभाग आहे का? जुहूतील घरी 6 तास चौकशी

(Raj Kundra Obscene Film Case Wife and Actress Shilpa Shetty 10 important questions by Crime Branch)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.