Raj Kundra Case | गुन्हे शाखेच्या प्रश्नांची उत्तरे देताना शिल्पा शेट्टी अस्वस्थ, ‘हॉटशॉट’बद्दल बोलताना म्हणाली ‘ते व्हिडीओ अश्लील नव्हते’

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि अश्लील चित्रपट प्रकरणातील आरोपी राज कुंद्रा (Raj Kundra) यांना रात्री उशिरा गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल कार्यालयात आणण्यात आले. सध्या गुन्हे शाखेची टीम त्याच्याकडे चौकशी करत आहे.

Raj Kundra Case | गुन्हे शाखेच्या प्रश्नांची उत्तरे देताना शिल्पा शेट्टी अस्वस्थ, ‘हॉटशॉट’बद्दल बोलताना म्हणाली ‘ते व्हिडीओ अश्लील नव्हते’
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि अश्लील चित्रपट प्रकरणातील आरोपी राज कुंद्रा (Raj Kundra) यांना रात्री उशिरा गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल कार्यालयात आणण्यात आले. सध्या गुन्हे शाखेची टीम त्याच्याकडे चौकशी करत आहे. शुक्रवारी राज कुंद्राला त्याच्या जुहू बंगल्यात नेण्यात आले होते, त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने राज कुंद्रा आणि त्यांची पत्नी शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांची 6 तास समोरासमोर चौकशी केली. सूत्रांच्या माहितीनुसार या चौकशीत शिल्पा खूपच अस्वस्थ दिसत होती. तिने प्रश्नांची उत्तरे देणे देखील टाळले.

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिल्पा शेट्टीने चौकशी दरम्यान सांगितले की, आपल्याकडे हॉटशॉट्सच्या कंटेंटची पूर्ण व योग्य माहिती नाही. या अ‍ॅपशी तिचा काही संबंध नाही, असा दावाही तिने केला. शिल्पाने असा दावा केला आहे की, हे अॅप राज कुंद्राचे नसून तिचे मेहुणे प्रदीप बक्षी यांचे आहे आणि त्याचे काम देखील तेच पाहतात. आपला नवरा निर्दोष असून, या अॅपवरील व्हिडीओ हे अश्लील नसून, एरॉटीक श्रेणीतील आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टीला प्रॉपर्टी सेलच्या दोन अधिकाऱ्यांनी 20 ते 25 प्रश्न विचारले. शिल्पा शेट्टीला राज कुंद्रा निर्मित अश्लील चित्रपटांशी संबंधित ‘हॉटशॉट’ अ‍ॅपबद्दल पूर्ण माहिती असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. शिल्पा या कंपनीत संचालक म्हणून काम करत होती, तरी नंतर तिने राजीनामा दिला होता. राजच्या अनेक मालमत्तांशी संबंधित चौकशीसाठी तिला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल कार्यालयात आणले होते. सध्या राज कुंद्रा चौकशी अजूनही सुरू आहे. आज, राज कुंद्राला त्याच्या विविध मालमत्ता आणि ते खरेदी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पैशांच्या स्त्रोताबद्दल विचारणा केली जाईल.

गुन्हे शाखेचे प्रश्न, शिल्पा शेट्टीचे उत्तर

काल, 6 तासांच्या चौकशी दरम्यान गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शिल्पा शेट्टीला पहिला प्रश्न विचारला की, राज कुंद्राच्या अश्लील रॅकेटबद्दल तुम्हाला माहिती आहे? रॅकेटमधून मिळालेले पैसे वियान इंडस्ट्रीला पाठवले गेले हे खरे आहे की नाही? यामध्ये ती 2020 पर्यंत स्वत: दिग्दर्शक होती?

या प्रश्नांची उत्तरे देताना शिल्पा शेट्टी म्हणाली की, ‘हॉटशॉट’ वर असलेले व्हिडीओ अश्लील व्हिडीओ नाहीत. ते केवळ कामुक व्हिडीओ आहेत. शिल्पा शेट्टी यांनीही असे उत्तर दिले की, अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मवरही अशीच सामग्री उपलब्ध आहे. ते व्हिडीओ तिच्या पतीने बनवलेल्या चित्रपटांपेक्षा अधिक अश्लील आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राप्रमाणेच शिल्पा शेट्टी यांनीही असे उत्तर दिले की, या प्रकरणात आपला काहीही सहभाग नाही.

(Shilpa Shetty said that she wasn’t aware of the exact content of HotShots)

संबंधित बातम्या :

Raj Kundra Case | आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा, राज कुंद्राची मुंबई हायकोर्टात धाव

अश्लील चित्रपट प्रकरणात Shilpa Shetty चा सहभाग आहे का? जुहूतील घरी 6 तास चौकशी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI