AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’बद्दल अशी चर्चा…, ‘या’ दाव्यावर अखेर रितेशने सोडलं मौन

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. सिनेमाबद्दल अनेक दावे केले जात आहेत, ज्यावर अखेर रितेश याने मौन सोडलं आहे.

Raja Shivaji : 'राजा शिवाजी'बद्दल अशी चर्चा..., 'या' दाव्यावर अखेर रितेशने सोडलं मौन
Riteish Deshmukh
| Updated on: May 10, 2026 | 1:03 PM
Share

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित आणि स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमा 1 मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. गेल्या 10 दिवसांपासून सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. हिंदी भाषेच्या तुलनेत मराठी भाषेतील सिनेमाला प्रेक्षकांनी अधिक पसंती दिली. एकीकडे सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत आहे तर, दुसरीकडे सिनेमाबद्दल अनेक चर्चा देखील सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगल्या आहे. सिनेमाचा बजेट 100 कोटींचा आहे… अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. यावर अखेर रितेश याने मौन सोडलं आहे.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत रितेश याने ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या बजेटबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. रितेश म्हणाला, ‘सिनेमाच्या बजेटबद्दल फक्त निर्मात्यांना माहिती असतं… तर प्रेक्षकांनी फक्त सिनेमाचा आनंद घ्यायला हवा… त्यांनी आकड्यांचा अधिक विचार करायला नको…’

‘जेव्हा आम्ही लहानपणी अमिताभ बच्चन यांचा ‘शोले’ पाहायला जायचो तेव्हा कधीच सिनेमाचा बजेट विचारला नाही. आम्ही फक्त मोठ्या पडद्याचा आनंद घ्यायला जायचो… पण आता सिनेमाची कमाई आणि कलाकारांचं मानधन यावर अधिक चर्चा होऊ लागली आहे. कुठेतरी याचं कारण इंडस्ट्री देखील आहे…’ रितेश याच्या म्हणण्यानुसार, ‘प्रेक्षकांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट सिनेमातून आलेला अनुभव असला पाहिजे, सिनेमाचा बजेट नाही…’ एवढंच नाही तर, सिनेमाच्या यशाबद्दल देखील अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘राजा शिवाजी सिनेमा मराठी सिनेविश्वासाठी मोठा रेकॉर्ड ठरत आहे… येत्या काळात दुसऱ्या मराठी सिनेमांनी देखील हा रेकॉर्ड मोडला पाहिजे…’ असं देखील रितेश म्हणाला.

सिनेमाच्या बजेटवर अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य

मुलाखतीत अभिषेक बच्चन म्हणाला, ‘हॉलिवूड सिनेमांमध्ये VFX वर तब्बल 5 हजार कोटींपेक्षा अधिक पैसे खर्च केले जातात. भारतीय सिनेमांकडे तितका बजेट नसतो… भारतीय दिग्दर्शक फार कमी कालावधीत सिनेमा तयार करतात आणि प्रेक्षकांना चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न करतात. VFX ला योग्य न्याय देण्यासाठी फक्त पैसा नाही तर, वेळ देखील फार लागतो.. असं देखील अभिनेता म्हाणाला.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?