राजेश खन्ना यांचं डिंपल कपाडियासोबत दुसरं लग्न… मोठं गुपित समोर येईल म्हणून घेतलेला मोठा निर्णय… कोण होती पहिली पत्नी?
डिंपल कपाडिया नाही तर, कोण होती राजेश खन्ना यांची पहिली पत्नी... असं कोणतं रहस्य होतं ज्यामुळे डिंपल यांच्यासोबत उरकलं लग्न? अनेक वर्षांनंतर अखेर मोठं सत्य समोर...

दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्या खासगी आयुष्याबद्दल आजही चर्चा सुरु असतात. कारण जो स्टारडम राजेश खन्ना यांनी त्यांच्या काळात पाहिला, तो त्यापूर्वी कोणत्यात अभिनेत्याने अनुभवला नव्हता… आजही राजेश खन्ना यांच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत असतात. त्यांच्या कारवर कायम लिपस्टिकचे डाग असायचे. जेव्हा राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न केलं तेव्हा अनेक महिलांनी पांढऱ्या साड्या नेसल्या. पण राजेश खन्न यांनी डिंपल यांच्यापूर्वी अभिनेत्री अंजू महेंद्र यांच्यासोबत लग्न गुपचूप लग्न केलं होतं. त्या काळी एका प्रसिद्ध मॅगझिनमधून हे सत्य समोर आलं होतं.
राजेश खन्ना आणि अंजू महेंद्र रिलेशनशिपमध्ये होते आणि दोघे अनेक वर्ष लिव्हइन रिलेशनशिपमध्ये देखील होते… असं देखील सांगण्यात होतं. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका शोभा डे यांनी स्टारडस्टच्या संपादक असताना ही बातमी प्रकाशित करण्याबद्दल उघडपणे सांगितलं.
शोभा डे यांनी सांगितल्यानुसार, ‘पहिला आणि सर्वात खळबळजनक मुद्दा राजेश खन्ना यांनी गुपचूप लग्न केलं होतं का याबद्दल होता. संबंधित माहिती नारी हिरा यांच्याकडून मिळाली होती. कारण नारी हिरा आणि अंजू महेंद्र यांची आई एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांनी आम्हाला त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं आणि ते सत्य समोर आणलं… मी यापूर्वी कधीही कोणाबद्दल एवढी क्रेझ पाहिली नाही. राजेश खन्ना त्यांच्या शिखरावर असताना निर्माण केलेल्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेची बरोबरी सर्व खान एकत्र आल्यानंतर देखील करु शकत नाहीत. ‘
राजेश खन्ना यांनी दबावाखाली डिंपल कपाडियाशी लग्न केले का?
राजेश खन्ना आणि डिंपल यांच्या लग्नाबद्दल विचारण्यात आल्यानंतर शोभा डे म्हणाल्या, राजेश खन्ना यांनी दबावाखाली लग्न केलं. मला वाटतं ते 100 टक्के खरं होतं कारण ते कधीच हे सत्य नाकारु शकले नाहीत. पण जेव्हा सत्या समोर आलं तेव्हा त्यांनी डिंपल यांच्यासोबत लग्न केलं…’ सांगायचं झालं तर, 1973 मध्ये राजेश खन्ना यांनी स्वतःपेक्षा अनेक वर्ष लहान डिंपल यांच्यासोबत लग्न केलं. राजेश खन्ना आणि डिंपल यांना दोन मुली आहेत.
