‘आ मेरे दिल मैं बस जा मेरे आशिक़ आवारा’, शालूची प्रेमाची साद, पोरांच्या फोटोवर उड्या!

मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेला प्रयोगशील आणि मातीतला दिग्दर्शक नागराज मंजुळेने त्याच्या पहिल्याच चित्रपटात महाराष्ट्राला एक गोड जोडी दाखवली ती म्हणजे जब्या आणि शालू..

'आ मेरे दिल मैं बस जा मेरे आशिक़ आवारा', शालूची प्रेमाची साद, पोरांच्या फोटोवर उड्या!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेला प्रयोगशील आणि मातीतला दिग्दर्शक नागराज मंजुळेने त्याच्या पहिल्याच चित्रपटात महाराष्ट्राला एक गोड जोडी दाखवली ती म्हणजे जब्या आणि शालू…! चित्रपटातून जब्या आणि शालू महाराष्ट्रात एवढे फेमस झाले की, आशिक मुलांना आपल्या शालूला पटवण्यासाठी काळ्या चिमणीच्या राखेची आठवण अनेकदा झाली. आता जब्या म्हणजेच सोमनाथ अवघडे आपल्या करिअरवर लक्ष फोकस करतोय तर शालूही आपले प्रोजेक्ट्स करतीये. (Rajeshwari Kharat Shalu Answer his Supporter on Social Media)

याच प्रोजेक्ट्सची माहिती शालू सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना देत असते. तसंच आपले विविध फोटो पोस्ट करुन शालू म्हणजे राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat)  आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आता सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोवर कमेंट तर येणारच ना… अशीच एक कमेंट राजेश्वरीच्या फोटोवर आली… आणि तिनेही ती कमेंट तितक्याच गमतीशीर पद्धतीने घेत त्या कमेंटला लक्षवेधी उत्तर दिलंय.

राजेश्वरीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन तिचा सुंदरसा फोटो पोस्ट केला होता. ‘आ मेरे दिल मैं बस जा मेरे आशिक़ आवारा’, असं कॅप्शन देऊन तिने आशिक पोरांना प्रेमाची साद घातली. साहजिकच पोरांनी राजेश्वरीच्या फोटोवर उड्या मारल्या. ‘कुणी तोडलंस.. जिंकलंस…. ठार केलंस’ अशा खास कोल्हापुरी अंदाजातल्या कमेंट केल्या… तर काहींनी मात्र शालूची फिरकी घेतली. अशाच फिरकी घेणाऱ्या चाहत्यांना राजेश्वरीने तिच्या गावरान अंदाजात उत्तर दिलं…

shalu photo

 

दिलखेचक अदा असणारा फोटो पोस्ट केल्यानंतर फोटोखाली शालूने एक लक्षवेधी कमेंट केली.. ती कमेंट होती… “नारळ फेकून मारीन आज जर कुणी फालतू कमेंट केल्या तर…”, ही कमेंट करताना तिने नारळ हातात घेतलेला आणखी एक फोटो पोस्ट केला… मग तर काय चाहत्यांची कमेंट करण्यासाठी झुंबड उडाली…

तिच्या एका चाहत्याने एक उपरोधिक कमेंट केली, शालू तू अंघोळ करुन ये… मी बघतो तोपर्यंत पोरांकडे… साहजिकच शालू उत्तर देणार हे त्याला माहिती होतं… मग शालूने सिक्सर ठोकला… पहिले तुम्हाला द्यावा का (पहिले तुमच्या डोक्यात नारळ हाणू का)… मी तशीच दिसते आणि आशा आहे मी छान दिसते… अशी कमेंट तिने केली.

दरम्यान, राजेश्वरीने काळ्या ड्रेसमध्ये एक सुंदरसा फोटो पोस्ट केला. त्या फोटोवर हजारेक कमेंट आल्या आहेत. काही कमेंटमधून चाहत्यांनी तिचं कौतुक केलंय. तर काही कमेंटमधून चाहत्यांनी तिच्यासाठी सुधारणा सुचवल्या आहेत. शेवटी काय शालूवरचं असलेलं चाहत्यांचं प्रेम काही केल्या कमी होत नाहीय इतकंच खरं….!

संबंधित बातम्या : 

Video : ‘भास वाटतोया, हे खरं का सपान…’; ‘फँड्री’ची शालू ग्लॅमरस झाली, व्हिडीओ पाहिला का?

Video : ‘सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली.. तरी झाली कुठ चुक मला कळना…’, शालूचा इश्किया अंदाज पाहाच!

निर्मात्याच्या मनमानी कारभाराविरोधात कलाकार एकवटले!

(Rajeshwari Kharat Shalu Answer his Supporter on Social Media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI