तू कुठं आहे, स्टुडिओत ये…राजेश्वरी खरातसोबत कास्टिंग काऊच; म्हणाली, त्याचा कॉल आला अन्…
फ्रँड्री चित्रपटातील अभिनेत्री राजेश्वरी खरातने कास्टिंग काऊचचा धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.

Rajeshwari Kharat Casting Couch : सिनेसृष्टीत एकदा चांगली कामं मिळायला लागली की पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही गोष्टी आपसुकच मिळतात. त्यामुळेच या क्षेत्रात नशीब आजमवण्याचा लाखो तरुण-तरुणी प्रयत्न करतात. यातील काहींना यश येते तर काहींची मात्र निराशा होते. सिनेसृष्टीत करिअर करू पाहणाऱ्या तरुणींचा मार्ग तर अधिकच खडतर असतो. कारण या क्षेत्रात काम मिळावे म्हणून या क्षेत्रातील काही जण तरुणींकडे शरीरसुखाची मागणी करतात. तशी अनेक प्रकरण समोर आलेली आहेत. काही अभिनेत्रींनीही याबाबतचे एनेक धक्कादायक प्रसंग सांगितलेले आहे. असे असतानाच आता मराठमोळी अभिनेत्री राजेश्वरी खरातनेही तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.
राजेश्वरी खरातने नुकतेच राजश्री मराठीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तिने कास्टिंग काऊचबद्दल भाष्य केलं. मी एका प्रोजेक्टसाठी रिहर्सल करत होते. त्यावेळी मला एका दिग्दर्शकाचा कॉल आला होता. तू कुठे आहे? असं त्यांनी मला विचारलं. त्यानंतर तुला तिथे किती वेळ लागेल? असा त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला. माझ्या स्टुडिओला ये असं ते मला म्हणाले होते. मग कुणी बोलवल्यानंतर लगेच कसं जाणार. त्यामुळे मी नेमकं काम काय आहे? असं विचारलं. त्यानंतर ते दिग्दर्शक संतापले, अशी आठवण राजेश्वरीने सांगितली.
तसेच, काय काम आहे हे तू मला विचारायचं नाहीस. मी बोलवलं की तू लगेच इथे आली पाहिजेस, असं ते मला म्हणाले. त्यांच्या या बोलण्यानंतर मी लगेच तिथे दुसऱ्या दिग्दर्सकांपुढे रडत होते. नंतर मी त्या दिग्दर्शकाचा फोनही उचलला नाही, अशी आठव राजेश्वरीने सांगितली. तसेच मला गार्गी ताईंनी अशा स्थितीत नेमकं कसं वागलं पाहिजे ते सांगितलं. तुला भविष्यात असे अनेक प्रसंग येतील पण नेमकं कसं खंबीरपणे वागलं पाहिजे, असं गार्गी ताईंनी मला सांगितलं अशीही आठवण राजेश्वरी खरातने दिली.
मी असली कामं करत नाही, पुन्हा मला…
तसेच कास्टिंग काऊचचाही एक गंभीर किस्सा तिने सांगितला. ‘दुसरा विषय म्हणजे कॉम्प्रमाईजचा विषय आहे. मला तशी विचारणा झालेली आहे. विशेष म्हणजे लोक त्याबद्दल विचारायला घाबरतही नाहीत. मला जेव्हा कॉम्प्रमाईजची विचारणा करण्यात आली, तेव्हा मी सरळ सांगितलं की मी असली कामं करत नाही,’ अशी आठवण राजेश्वरी खरातने सांगितली. तसेच याबाबत मला पुन्हा विचारायचं नाही, अशी तंबीही संबंधित व्यक्तीला दिल्याचं तिने सांगितलं.
