‘धुरंधर’च्या जमील जमालीचा 1 कोटी रुपयांच्या बोनसवर मोठा खुलासा, ‘माझ्या खात्यात तर…’
‘धुरंधर’चा जमील जमाली म्हणजे राकेश बेदी यांना दिग्दर्शकाने खरंच दिलंय 1 कोटींचं बोनस? अभिनेत्याकडून मोठं सत्य अखेर समोर...

अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमाने फक्त भारतात नाही तर, जगभरात अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहे. सिनेमाच्या दोन्ही भागांमुळे फक्त रणवीर याच्या लोकप्रियतेत वाढ झाली नाही तर, अन्य अभिनेत्यांच्या करियरला देखील मोठा फायदा झाला आहे. यापैकीच एक अभिनेता म्हणजे राकेश बेदी. राकेश बेदी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत, पण ‘धुरंधर’ सिनेमामुळे त्यांच्या लोकप्रियतेत आणि प्रसि द्धीत मोठी वाढ झाली. एवढंच नाही तर, राकेश बेदी यांच्यावर खूश होऊन दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी 1 कोटी बोनस दिल्याची माहिती देखील समोर आली. यावर आता राकेश बेदी यांनी मोठा खुलासा केला आहे.
‘धुरधंर’ सिनेमाच्या यशानंतर राकेश बेदी यांना 1 कोटी बोनस देण्यात अशी चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. यावर अभिनेत्याने एका व्हिडीओ पोस्ट करत सर्व चर्चांचं खंडन केलं आहे. राकेश बेदी म्हणाले, ‘मला अनेकांनी व्हिडीओ पाठवले आहेत… मित्र देखील मला व्हिडीओ पाठवत आहेत की, धुरंधरनंतर प्रॉडक्शन हाऊसने मला 1 कोटी रुपये पाठवले आहेत. पण कुठे आहे ते पैसे… कोणाच्या घरात पडले आहेत, कोणाच्या खिशात आहेत… मला सांगा यार… कोणी माझे पैसे लपवून ठेवले आहेत… सांगा म्हणजे मी त्याच्याकडून घेईल… माझ्या खात्यात तरी आतापर्यंत आले नाहीत…’, राकेश बेदी म्हणाले.
सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी राकेश बेदी यांनी धुरंधर सिनेमात काम केल्याबद्दल स्वतःचं मत व्यक्त केलं होतं. ”धुरंधर 2′ सिनेमाचा देखील एक भाग असल्याचा मला अभिमान आहे… मला सांगायला आवडेल की, धुरंधर सिनेमाने फक्त बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडले नाहीतर, नविन विक्रम रचले आहेत. ‘धुरंधर’ सिनेमाने फक्त भारतीय प्रेक्षकांच्या नाही, जगभरातील सर्वच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सिनेमा पाहणाऱ्या भारतीय जनतेवरही त्याचा खोलवर परिणाम झाला आहे.’, असं देखील राकेश बेदी म्हणाले.
‘धुरंधर 2’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘धुरंधर’ सिनेमाला प्रदर्शित होऊन एक महिला उलटला आहे, तरी देखील चित्रपटगृहात चाहत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. SacNilc च्या ताज्या रिपोर्टनुसार, रणवीर सिंगच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ने प्रदर्शनाच्या 36 व्या दिवशी 1.40 कोटी रुपयांची कमाई केली असून, पाचव्या आठवड्याची एकूण कमाई 19.47 कोटींपर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत, या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 1122.49 कोटी निव्वळ कमाई आणि 1343.56 कोटींची ऐतिहासिक कमाई केली आहे.
