AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakhi Sawant | तुरुंगात आदिलची भेट घेतल्यानंतर राखी सावंतचा राग अनावर; म्हणाली “त्याची सगळी पोलखोल..”

आदिल कोठडीत असताना राखी त्याला भेटायला गेली. मात्र जेव्हा ती त्याला भेटून बाहेर आली, तेव्हा ती रागाच्या भरात दिसली. आदिलबद्दल बोलताना राखी म्हणाली की "मी त्याची सर्व पोलखोल करेन." तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rakhi Sawant | तुरुंगात आदिलची भेट घेतल्यानंतर राखी सावंतचा राग अनावर; म्हणाली त्याची सगळी पोलखोल..
Adil Khan Durrani and Rakhi SawantImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 20, 2023 | 9:17 AM
Share

मुंबई : अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. राखीने त्याच्यावर फसवणुकीचा, मारहाण केल्याचा आणि पैसे बळकावल्याचा आरोप केला आहे. राखीच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी आदिलविरोधात एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आदिल कोठडीत असताना राखी त्याला भेटायला गेली. मात्र जेव्हा ती त्याला भेटून बाहेर आली, तेव्हा ती रागाच्या भरात दिसली. आदिलबद्दल बोलताना राखी म्हणाली की “मी त्याची सर्व पोलखोल करेन.” तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आदिलची भेट घेतल्यानंतरचा राखीचा हा व्हिडीओ आहे. आदिलच्या कुटुंबीयांकडून तिलो कोणता कॉल किंवा मेसेज आला का, असा प्रश्न राखीला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणते, “त्यांना माहितीये की त्यांचा मुलगा किती सेटिंगबाज आहे. तो तुरुंगातून सुटून जाईल. मात्र मीसुद्धा बघेन की तो कसा सुटतो? ही राखी सावंतची केस आहे. मी मीडियासमोर त्याची सर्व पोलखोल करेन, मी शांत बसणार नाही.”

बिग बॉस मराठीच्या घरात असताना राखीने आदिलला काही पैसे दिले होते. हे पैसे तिने तिच्या आजारी आईच्या उपचारासाठी त्याच्याकडे दिले होते. काही दिवसांपूर्वीच राखीच्या आईचं कॅन्सर आणि ब्रेन ट्युमरने निधन झालं. त्यानंतर राखीने आदिलवर तिचे पैसे हडपल्याचा आरोप केला आहे. “मी त्याला विचारलं की माझे 1 कोटी 60 लाख रुपये त्याने कुठे ठेवले आहेत? मी त्याला नव्या कारविषयीही प्रश्न विचारला. मात्र तो माझ्याशी नीट बोलला नाही. तुला काय करायचंय असं उत्तर त्याने दिलं. मी सुद्धा त्याला माफ करणार नाही”, असं राखी म्हणाली.

गर्भपाताचा आरोप

“बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी माझं एक ऑपरेशन झालं होतं. मला त्यांनी सांगण्यास नकार दिला होता. मात्र आता मी शांत बसणार नाही. माझा खूप मोठा ऑपरेशन झाला होता आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं की तीन महिन्यांपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. मात्र तो 10 दिवससुद्धा थांबू शकला नव्हता. डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की जर आता तू प्रेग्नंट राहिलीस तर तुझ्या प्रकृतीसाठी ते ठीक नसेल. तुझ्या जीवालाही धोका आहे”, असाही आरोप राखीने याआधी केला होता.

“तुम्ही बिग बॉस मराठी पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की मी म्हटलं होतं, मी गरोदर आहे. तुमच्याकडे ते फुटेज असेल तर काढून पहा. मी प्रेग्नंट होती, मात्र जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर आली तेव्हा त्याने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला. तेव्हाच माझा गर्भपात झाला”, असं ती म्हणाली होती.

मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.