दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लेकीसाठी राखी सावंतने केली विदेशातून मोठी खरेदी, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने गोंडस मुलीला जन्म दिलाय. मुलीच्या जन्मानंतर दीपिका हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. दीपिका पादुकोण हिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपल्याला मुलगी झाल्याची बातमी सर्वांसोबत शेअर केली.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. दीपिका पादुकोण हिने मुलीला जन्म दिलाय. एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी सांगितले की, मुलगी झाली. दीपिका पादुकोण हिने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट करत दीपिकाला शुभेच्छा दिल्या. फक्त चाहतेच नाही तर दीपिका पादुकोणला अनेक कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिका पादुकोण आणि तिच्या मुलीची तब्येत उत्तम असल्याचेही सांगितले गेले. दीपिका पादुकोणवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.
विशेष म्हणजे डिलीवरीच्या आदल्यादिवशीच दीपिका पादुकोण ही पती रणवीर सिंह याच्यासोबत सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळीचे तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. दीपिका पादुकोण ही खास बनारसी साडीमध्ये मंदिरात पोहोचली.
आता नुकताच राखी सावंत हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये राखी सावंत ही सुरूवातीला दीपिकाला शुभेच्छा देताना दिसली. राखी म्हणाली की, आपण दोघी एकाच डान्स क्लासमध्ये होतो. तू मोठी अभिनेत्री झाली मोठ्या अभिनेत्याची पत्नी झाली आणि आता आई झाली.
View this post on Instagram
दीपिका मला मावशी होऊन खूप खूप आनंद होत असल्याचेही राखी सावंत हिने म्हटले. फक्त हेच नाही तर दीपिका पादुकोणच्या मुलीसाठी खेळणी खरेदी करताना दुबईच्या स्टोरमध्ये राखी सावंत दिसत आहे. आपण दीपिका पादुकोण हिच्या मुलीसाठी काय काय खरेदी केले हे देखील दाखवताना राखी सावंत ही दिसत आहे. बऱ्याच गोष्टी राखी सावंत हिने दीपिकाच्या मुलीसाठी खरेदी केल्या आहेत.
व्हिडीओमध्ये पुढे राखी सावंत ही म्हणते की, मी आता दुबईला आहे या सर्व वस्तू मी दीपिकाकडे पाठवणार आहे. आता राखी सावंत हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओवर कमेंट देखील करत आहेत. राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून जास्तीत जास्त वेळ हा दुबईमध्ये घालवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या दुबईच्या घराची खास झलक दाखवली होती.