राखीचा जीवनमरणाचा संघर्ष, हे नाटक नाही, खरोखरच तब्येत गंभीर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचा दावा

राखी सावंत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वीच एक्स पती आदिल दुर्रानी याच्यावर गंभीर आरोप केले. हेच नाही तर यांचा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहचला आणि आदिलला काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ देखील आली. आता राखीचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

राखीचा जीवनमरणाचा संघर्ष, हे नाटक नाही, खरोखरच तब्येत गंभीर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचा दावा
Rakhi Sawant
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 8:15 PM

राखी सावंत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. राखी सावंतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वीच आदिल दुर्रानी नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले. हेच नाही तर अचानक आपण लग्न केल्याचे राखी सावंत हिच्याकडून सांगण्यात आले. आदिलसोबतच्या लग्नानंतर राखी सावंतने इस्लाम देखील स्वीकारला. लग्नाला काही दिवस पूर्ण होताच पतीवर अत्यंत गंभीर आरोप करताना राखी सावंत ही दिसली. आदिल दुर्रानी याला काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळही आली. आदिलनेही राखीवर बरेच आरोप केले.

सध्या सोशल मीडियावर राखी सावंत हिचे काही फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये रूग्णालयातील बेडवर बेशुद्ध पडलेली राखी सावंत दिसत आहे. सुरूवातीला हे फोटो पाहून लोकांना मोठा धक्का बसला. मात्र, राखी सावंत हे नाटक करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आले. मात्र, आता नुकताच राखी सावंतच्या जवळच्या व्यक्तीने अत्यंत मोठा खुलासा केलाय.

राखी सावंत हिचा एक्स पती रितेश याने म्हटले की, राखी सावंत कोणतेही नाटक करत नाहीये. तिची तब्येत खरोखरच अत्यंत गंभीर आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून तिच्या छातीमध्ये त्रास होता. त्यानंतर त्रास वाढल्याने तिला रूग्णालयात घेऊन जात असताना ती बेशुद्ध पडली. आता राखी सावंतवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

राखी सावंत हिच्या आयुष्यात बऱ्याच काही गोष्टी सुरू आहेत. यामुळे राखी टेन्शनमध्ये होती. जर राखी हे सर्व नाटक करत असती तर मी तिच्यासोबत कधीच नसतो. नेमके काय सुरू आहे, हे सांगण्यासाठी मी आता पुढे आलोय. तिच्या मॅनेजरच्या रूपामध्ये मला ही माहिती सांगावी लागत आहे. कारण बऱ्याच गोष्टी अत्यंत गंभीर आहेत.

पुढे रितेश म्हणाला की, या प्रसंगी मी राखी सावंत हिच्यासोबत आहे. राखी सावंतची तब्येत नाजूक असल्याचेही रितेशने सांगितले. हेच नाही तर राखीसाठी देवाकडे प्रार्थना करण्याची देखील विनंती रितेश याने केलीये. राखी सावंत हिच्या बऱ्याच टेस्ट होणे देखील अजून शिल्लक आहे. मात्र, राखी सावंत हिच्यावर नेमक्या कोणत्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत, हे अजूनही कळू शकले नाहीये.

'संजय राऊतांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक..', थेट पवार कुटुंबातूनच फटकारे
'संजय राऊतांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक..', थेट पवार कुटुंबातूनच फटकारे.
शिंदे काय बोलले की एका वाक्यानं थेट 'आपत्ती व्यवस्थापन समिती'त एन्ट्री
शिंदे काय बोलले की एका वाक्यानं थेट 'आपत्ती व्यवस्थापन समिती'त एन्ट्री.
'आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचाच धंदा...', धस भडकले, कशावरून जुंपली?
'आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचाच धंदा...', धस भडकले, कशावरून जुंपली?.
बँकॉक फ्लाईट... एका फोननं गल्ली-दिल्लीपर्यंत सारी यंत्रणा टाईट?
बँकॉक फ्लाईट... एका फोननं गल्ली-दिल्लीपर्यंत सारी यंत्रणा टाईट?.
शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल पवारांसोबत, त्या सत्कारावरून राऊत भडकले
शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल पवारांसोबत, त्या सत्कारावरून राऊत भडकले.
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी.
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.