Rakhi Sawant | ‘आई शपथ माझं लग्न झालंय, पण….’, पतीसोबतच्या नात्यावर राखी सावंतचे पुन्हा मोठे वक्तव्य…  

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही काळापासून लग्न आणि पतीबाबत बर्‍याच वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहे. राखी तिच्या पतीबद्दल बर्‍याच वेळा बोलली आहे, परंतु तिने कधीही त्याला कॅमेरा समोर आणले नाही.

Rakhi Sawant | ‘आई शपथ माझं लग्न झालंय, पण....’, पतीसोबतच्या नात्यावर राखी सावंतचे पुन्हा मोठे वक्तव्य...  
राखी सावंत
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 2:15 PM

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही काळापासून लग्न आणि पतीबाबत बर्‍याच वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहे. राखी तिच्या पतीबद्दल बर्‍याच वेळा बोलली आहे, परंतु तिने कधीही त्याला कॅमेरा समोर आणले नाही. बरेच लोक असेही म्हणतात की, राखीने लग्न केले नाही किंवा तिचा नवराच नाही. तथापि, आता राखीने तिच्या आईची शपथ घेत, आपण खरोखरच लग्न केले आहे, असे म्हटले. वास्तविक, राखी नुकतीच सिद्धार्थ काननच्या शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने पती रितेशबद्दल चर्चा केली (Rakhi Sawant takes mothers oath to prove that she really have husband).

जेव्हा राखीला तिच्या नवऱ्याबद्दल विचारले गेले की, रितेश खरोखरच तिचा नवरा आहे की हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे? तेव्हा ती म्हणाली, ‘माझ्यासाठी माझ्या आईपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. मी कधीच खोटे बोलत नाही. मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते की, माझा नवरा आहे. माझे लग्न झाले, पण तो भारतात नाही. तो भारताबाहेर राहतो.’

पतीसोबत नांदेन की नाही, याचे उत्तर नाही!

तथापि, राखीने असेही सांगितले की,  पती रितेशसोबत तिचे संबंध आता कोणत्या टप्प्यावर आहेत, हे माहित नाही. राखी म्हणाली, मी कोणत्या टप्प्यावर आहे हे आता मला माहित नाही. मी लग्नाच्या टप्प्यावर आहे की नाही, हे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मी माझ्या पतीबरोबर राहणार की, नाही हे मला माहित नाही. ते घटस्फोट घेतील की नाही, हे देखील माहित नाही. तो सध्या कॅनडामध्ये आहे आणि आपल्या इथे अद्याप व्हिसा सुरू झाला नाही, म्हणून मी आता काहीही बोलणार नाही (Rakhi Sawant takes mothers oath to prove that she really have husband).

राखीने सांगितले की रितेशबरोबर सहभाग घेण्यासाठी तिला अनेक शोच्या ऑफर येत आहेत. राखी म्हणाली की, तिची आई लवकरात लवकर बरी होताच ती पुन्हा एकदा कामावर लक्ष केंद्रित करेल.

सलमान खानचे मानले आभार

सलमान खानचे आभार मानत राखी म्हणाली की, सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खान यांच्यामुळेच माझ्या आईवर शस्त्रक्रिया आणि उपचार झाले. राखी जेव्हा बिग बॉस 14मध्ये होती, तेव्हा तिने सलमान खानला तिच्या आईच्या आजाराविषयी सांगितले होते. सलमानने देखील तातडीने त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली होती. राखीच्या म्हणण्यानुसार, सलमानचा भाऊ सोहेल खाननेही त्याच्या आईच्या उपचारांची पूर्ण काळजी घेतली. केवळ त्यामुळेच तिच्यावर योग्य उपचार करणे शक्य झाले. राखीने सलमान खानचे आभार मानले आणि त्याला ‘देवदूत’ म्हटले. संकटात असलेल्यांना मदत करण्यासाठी तो नेहमीच तयार असतो.

(Rakhi Sawant takes mothers oath to prove that she really have husband)

हेही वाचा :

‘लोकं अन्नासाठी भटकतायत आणि तुम्ही पैसे उधळताय!’, ‘व्हेकेशन मोड’वर असलेल्या बॉलिवूडकरांना नवाजुद्दीनने फटकारले!

सोनू सूदची कोरोनावर मात, आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच कंगना म्हणाली…

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.