AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्षाबंधनावर आधारित हे गाणं ऐकून डोळ्यांत येईल पाणी, चित्रपटाची कथा एकदम जबरदस्त

रक्षाबंधनावर आधारित हे गाणं ऐकून तुमच्या देखील डोळ्यात येईल पाणी. भाऊ राखीसाठी वाट पाहत असतानाच बहिण सासरी घेते टोकाचा निर्णय. आजही हे गाणं ऐकताना डोळे भरून येतात.

रक्षाबंधनावर आधारित हे गाणं ऐकून डोळ्यांत येईल पाणी, चित्रपटाची कथा एकदम जबरदस्त
| Updated on: Aug 28, 2026 | 4:09 PM
Share

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या आयुष्यभर रक्षणाचे वचन देतो. मात्र, 2022 मध्ये आलेल्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटातील दोन गाणी याच नात्याची एक अशी भावनिक बाजू दाखवतात, जी मन हेलावून टाकते. ‘तेरे साथ हूं मैं’ आणि ‘बिदाई’ या गाण्यांमधून भावाचे बहिणींवरील प्रेम तर दिसतेच, पण त्यासोबत समाजातील एका कटू वास्तवाचीही जाणीव होते.

‘तेरे साथ हूं मैं’ या गाण्यात अक्षय कुमार साकारत असलेला भाऊ आपल्या बहिणीच्या लग्नासाठी मोठी धडपड करताना दिसतो. बहिणीचे लग्न सुखरूप पार पडावे यासाठी तो दुकान गहाण ठेवतो. बहिणीला चांगले आयुष्य मिळावे, यासाठी स्वतःच्या अडचणींकडे दुर्लक्ष करणाऱ्या भावाची भावनिक अवस्था या गाण्यात पाहायला मिळते.

या गाण्याला हिमेश रेशमिया यांनी संगीत दिले असून इरशाद कामिल यांनी गीत लिहिले आहे. निहाल तौर यांनी हे गाणं गायले आहे. बहिणीच्या लग्नाचा आनंद, भावाची धावपळ आणि बहिणीच्या निरोपाचा भावनिक क्षण यामुळे हे गाणं मनाला भिडते.

‘बिदाई’मध्ये आनंदाचे रूपांतर दुःखात

मात्र ‘बिदाई’ गाण्याची कथा यापेक्षा अधिक वेदनादायी आहे. बहिणीचे लग्न झाल्यानंतर तिच्या पहिल्या राखीसाठी तिची वाट पाहणारा भाऊ तिच्यासाठी मोठा त्याग करतो. मात्र त्याच वेळी त्याला बहिणीने आत्महत्या केल्याची बातमी मिळते. ही बातमी ऐकून तो हादरतो आणि बहिणीच्या सासरी पोहोचतो. तिथे त्याला बहिणीचा मृतदेह पाहावा लागतो.

रक्षाबंधनासारख्या आनंदाच्या दिवशी बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधण्याऐवजी तिची अंत्ययात्रा निघणे हा प्रसंग या गाण्यातून अत्यंत वेदनादायी पद्धतीने मांडण्यात आला आहे. नूरन सिस्टर्स आणि रोमी यांच्या आवाजातील ‘बिदाई’ गाणं या प्रसंगाचा भावनिक परिणाम आणखी तीव्र करते.

अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ची भावनिक कथा

आनंद एल. राय दिग्दर्शित ‘रक्षाबंधन’मध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून भूमी पेडणेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. चित्रपटात भावाच्या चार बहिणींची कथा आणि त्यांच्यासाठी भावाने केलेला संघर्ष दाखवण्यात आला आहे. सुमारे 70 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 61.61 कोटी रुपयांची कमाई केल्याचे उपलब्ध आकडेवारीत नमूद आहे.

Follow Us
नाशिकच्या शेती क्षेत्रातील क्रांती विलक्षण, फडणवीसांकडून शेतकऱ्यांचे..
नाशिकच्या शेती क्षेत्रातील क्रांती विलक्षण, फडणवीसांकडून शेतकऱ्यांचे कौतुक
महाप्रलयात जीव मुठीत धरून कुटुंब; प्रत्येक क्षण... नवा थरारक व्हिडिओ
Nepal Flood Update | महाप्रलयात जीव मुठीत धरून कुटुंब; प्रत्येक क्षण... नवा थरारक व्हिडिओ समोर
मुंबई महापौरपदाचा फॉर्म्युला काय? शिंदे गटाला अडीच वर्षांची संधी?
मुंबई महापौरपदाचा फॉर्म्युला काय? शिंदे गटाला अडीच वर्षांची संधी?
रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी;
रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी; स्वामींना बांधणार राखी
ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
MNS On Marathi Sakti | ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरे...
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरेंच्या बहिणीसोबतचे खास फोटो समोर
दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
Disha Salian Case Update | दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्हिडीओ
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले...
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले त्यांनी...  नेमकं प्रकरण काय?
प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
Raksha Bandhan 2026 | प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो