New Project | बाहुबलीच्या भल्लालदेवची ओटीटीवर धडाकेबाज एन्ट्री, ‘या’ सीरीजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Jan 04, 2021 | 11:53 AM

बाहुबली चित्रपटातून प्रसिद्ध झालेला भल्लालदेव अर्थात राणा डग्गुबाती (Rana Daggubati) यावर्षी डिजिटल डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले नशीब आजमावणार आहे.

New Project | बाहुबलीच्या भल्लालदेवची ओटीटीवर धडाकेबाज एन्ट्री, 'या' सीरीजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : बाहुबली चित्रपटातून प्रसिद्ध झालेला भल्लालदेव अर्थात राणा डग्गुबाती (Rana Daggubati) यावर्षी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले नशीब आजमावणार आहे. चित्रपटांमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर तो आता वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार 2021 मध्ये राणा डग्गुबाती वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. अमेरिकन वेब सीरीज ‘रे डोनोवन’ ची ही वेब सीरीज रीमेक असणार आहे. (Rana Daggubati’s entry on the digital platform)

‘रे डोनोवन’ चे आतापर्यंत 7 भाग प्रदर्शित झाले आहेत. ही वेब सीरीज क्राइमवर आधारित आहे. या वेब सीरीजमध्ये डोनोवनचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. ज्यामध्ये तो इतरांच्या समस्या कायदेशीर मार्गाने सोडवताना दिसतो पण तो स्वतःच्या समस्या सोडवू शकत नाही. या वेब सीरीजचे आतापर्यंत 7 भाग प्रदर्शित झाले आहेत.

‘रे डोनोवन’ चा आठवे सीझन नुकताच रद्द केले आहे. या वेब सीरीजमध्ये मुख्य भूमिका करत असलेले लीव श्राइबर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले की, ‘रे डोनोवन’ वेब सीरीजचे आतापर्यत 7 भाग प्रदर्शित झाले आहेत आताच हि सीरीज संपणार नसून या सीरीजवर एक चित्रपट काढण्यात येणार आहे.

भारतातील मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मने या वेब सीरीजचे हक्क विकत घेतले आहेत आणि आता या वेब सीरीजचा रिमेक होणार आहे. ज्यामध्ये राणा डग्गुबतीची मुख्य भूमिका या वेब सीरीजमध्ये असणार आहे. या वेबसीरीजशिवाय अभिनेता यावर्षीही काही मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यात ‘हाथी मेरे साथ’, ‘1945’, ‘मदाई तिरुंटू’, ‘हिरण्यकश्यप’, ‘विराट पर्वम’ यासारख्या चित्रपटांत तो दिसणार आहे.

संबंधित बातम्या : 

Posters | ‘तांडव’मध्ये राजकारणातले मोहरे आमनेसामने, डायलॉगने वाढवली उत्सुकता!

Digital Debut | व्हिलन ते कॉमेडियन, अभिनेता रणजित यांचे डिजिटल विश्वात पदार्पण!

(Rana Daggubati’s entry on the digital platform)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI