AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप झाल्यानंतर पहिल्यांदा समोर आला रणवीर सिंग, आनंद व्यक्त करत म्हणाला…

Ranveer Singh: दीपिका पादुकोण - रणवीर सिंग यांच्या घरात गोंडस मुलीचं आगमन, बाप झाल्यानंतर पहिल्यांदा समोर येत अभिनेता म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणवीर सिंग याच्या वक्तव्याची चर्चा...

बाप झाल्यानंतर पहिल्यांदा समोर आला रणवीर सिंग, आनंद व्यक्त करत म्हणाला...
| Updated on: Sep 30, 2024 | 11:56 AM
Share

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी काही दिवसांपूर्वी गोंडस मुलीचं जगात स्वागत केलं. मुलीच्या जन्मानंतर दीपिका आणि रणवीर दोघे देखील कॅमेऱ्यापासून दूर होते. दीपिका कॅमेऱ्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहते. पण बाप झाल्यानंतर रणवीर पहिल्यांदा कॅमेऱ्या समोर आला आणि आनंद व्यक्त केला.

सध्या रणवीर सिंग याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात रणवीर याला स्पॉट करण्यात आलं. कार्यक्रमात पापाराझींना पाहताच अभिनेता त्यांच्याकडे आला आणि ‘बाप झालो रे…’ असं मोठ्या आनंदात म्हणाला. सध्या सोशल मीडियावर रणवीर याचा व्हिडीओ तुफान चर्चेत आहे.

व्हिडीओमध्ये रणवीर याने आनंद चाहत्यांसोबत देखील शेअर केला. विरेंद्र चावला याने इन्स्टाग्रामवर अभिनेत्याचा एक व्हिडीओ पोस्ट केले आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर करत प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘डॅशिंग डॅड…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘तो म्हणाला बाप झालो रे… अभिनेता प्रचंड आनंदी आहे.’, तर अनेकांनी अभिनेत्याला शुभेच्छा देखील दिल्या.

दीपिका आणि रणबीर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीचा जन्म झाल्याची माहिती दिल्यानंतर फक्त चाहत्यांनीच नाही तर, सेलिब्रिटींनी देखील दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. 8 सप्टेंबर रोजी दीपिका हिने मुलीला जन्म दिला.

दीपिका पादुकोण – रणवीर सिंग यांचे आगामी सिनेमे

दीपिका पादुकोण – रणवीर सिंग यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, दोघे देखील दिग्दर्शक रोहीत शेट्टी याच्या ‘सिंघम अगेन’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सिनेमाचे काही पोस्टर देखील दीपिका – रणवीर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सिनेमात दोघांसोबत अजय देवगन, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, करीना कपूर, टायगर श्रॉफ यांच्यासोबत अन्स सेलिब्रिटी देखील झळकणार आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा