रणबीर कपूर राहाला झोपवताना म्हणतो हे खास गाणं; आलियाने सांगितला भन्नाट किस्सा
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा आता जवळजवळ 2 वर्षांची झाली आहे. जेव्हा ते दोघेही कोणत्याही कार्यक्रमात जातात तेव्हा त्यांना त्यांच्या मुलीबद्दल नक्कीच प्रश्न विचारले जातात. एका शोमध्ये आलियाला रणबीर आणि राहाच्या बॉंडबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यानंतर तिने सांगितले की रणबीर राहाला झोपवताना खास गाणे देखील म्हणतो.

बॉलिवूडची हीट जोडी रणबीर कपूर ,आलिया भट्टसह त्यांची मुलगी राहा देखील आता प्रसिद्धी झोतात असते. आलिया आणि रणबीर त्यांच्या मुलाखतींमध्ये राहाचे बरेच किस्से सांगताना दिसतात. अशाच एका शोमध्ये आलियाने राहा आणि रणबीरच्या गोड नात्याच्या काही गोष्टी शेअर केल्या. त्यातील एक गोष्ट म्हणजे राहाला झोपवताना रणबीर लेकीसाठ खास अंगाई गातो.
रणबीर आणि राहामधील बॉंड
आलिया आणि करण जोहरने कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2’ मध्ये ‘जिग्रा’ चित्रपटाचे प्रमोशनसाठी आले होते. तेव्हा आलिया भट्टचे त्याच्या शोच्या मंचावर स्वागत करताना कपिल म्हणाला की, “आम्ही अखेरचं आलियाला आरआरआरच्या प्रमोशनसाठी ती शोमध्ये आली होती तेव्हा भेटलो होतो. त्यावेळी तिचे लग्नही झाले नव्हते आणि आता आलिया आई झाली आहे. तिची मुलगी राहा खूप गोंडस मुलगी आहे. आलिया, मला सांग रणबीर आणि रियामधील बॉन्डिंग कसे आहे?” असा प्रश्न विचारल्यानंतर तो पुढे म्हणाला, ‘गेल्या सीझनमध्ये जेव्हा नीतू मॅडम इथे आल्या होत्या तेव्हा त्या सांगत होत्या की रणबीर खूप शांत मुलगा आहे, पण जेव्हा राहा त्याच्यासमोर येते तेव्हा त्याचे डोळे चमकतात. हे खरे आहे का?”
रणबीर लेकीसाठी शिकला एक खास गाणे
कपिलच्या प्रश्नाचे उत्तर देताना आलिया म्हणाली की, ” राहा आणि रणबीरमधील नाते खूप वेगळे आहे. त्यांच्यात चांगली मैत्री आहे. तो राहा सोबत मिळून काहीही विचित्र खेळ खेळत असतो आणि तो स्वतः ते खेळ तयार करतो”, आलिया पुढे म्हणाली, “कधीकधी तो रहाला विचारतो की तिला कपाटात जाऊन कपड्यांना स्पर्श करायचा आहे का? आणि रिया हो म्हणते. मग ते दोघेही जाऊन कपड्यांशी खेळत बसतात. मग तो तिला शिकवतो की हे वेल्वेट कापड आहे, हे कॉटन आहे. राहासोबत रणबीर खूप साहसी आणि सर्जनशील असतो. त्याने केवळ राहाचे डायपरच बदलले नाहीत. तो तिच्यासाठी ‘उन्नी वावा वू’ ही अंगाई देखील म्हणतो.
आलियाने सांगितला राहाच्या अंगाईचा खास किस्सा
आलियाने सांगितले की राहाची एक नर्स आहे जी लहानपणापासून तिच्यासाठी एक गाणे म्हणते. त्या गाण्याचे बोल ‘उन्नी वावा वू’ असे काहीसे आहेत. हे गाणे आता राहासाठी एक अंगाईगीत बनले आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा राहाला झोपायचं असतं तेव्हा ती ‘मम्मा वावो, पापा वावो’ म्हणते. म्हणजे ती आपल्याला सांगते की आता मला झोप येत आहे आणि मला झोपायचे आहे. रणबीर राहासाठी ‘उन्नी वाव वू’ हे गाणंही शिकला असल्याचं आलियाने सांगितले. हे जे गाण आहे ते मल्याळम भाषेतील गाणे आहे आणि राहाची नर्स मल्याळम आहे. आलियाचे म्हणणे ऐकल्यानंतर करण जोहरने सांगितले की, त्याच्या मुलांची काळजी घेणारी सिस्टरही मल्याळीच आहे ते.
